शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महाऔष्णिक वीज केंद्राचे कार्य उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:55 IST

चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. केंद्राचे कार्यही उत्तम आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रितीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावणकुळे : चंद्रपूर वीज केंद्राची पाहणी, विविध कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्राचा देशात नावलौकिक आहे. केंद्राचे कार्यही उत्तम आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संचलन व देखभाल दुरुस्तीची कामे अधिक योग्य रितीने केल्यास संयंत्र वीज वापरात घट होऊन महत्तम वीज उत्पादन व आर्थिक बचत होण्यास मोठा हातभार लागेल. उपमुख्य अभियंता स्तराच्या अधिकाऱ्याने वीज उत्पादनासाठी चांगला कोळसा मिळविण्याकरिता कसोशीने पाठपुरावा करावा व शून्य डॅमरेजचे व्यवस्थापन करावे. वीज उत्पादनाच्या दैनंदिन कामकाजात अधिक व्यावसायिक सुलभतेची अंमलबजावणी करून अधिकाराचे विकेंद्रिकरण करावे, असे निर्देश राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाºयांना दिले.ना. चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी चंद्रपुरात आले असता त्यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची पाहणी केली. यावेळी ते अधिकाºयांशी बोलत होते.चंद्रपूर विद्युत केंद्राच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ५०० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ व ९ प्लांट कंट्रोल रूम, ई.एस.पी. परिसर, उपहार गृह, कुलिंग टॉवरलाही ना. बावनकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तंत्रज्ज्ञ आणि कंत्राटी कामगारांशी थेट संवाद साधला. त्यानंतर ५०० मेगावॅट सेवा इमारत येथील सर्च सभागृह येथे आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वीज केंद्राच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी बचतीसह वीज उत्पादन कायम राखल्याबद्दल त्यांनी वीज अधिकाºयांचे कौतुक केले. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी याबाबतचे संगणकीय सादरीकरण केले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे यांची उपस्थिती होती.‘त्या’ जागेवर सौर प्रकल्पचंद्रपूर वीज केंद्राच्या बंद केलेल्या प्रत्येकी २१० मेगावॅटच्या संच क्रमांक १ व २ च्या जागेवर सुमारे एक हजार मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प किंवा ६६० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प उभारता येईल काय, यादृष्टीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.