शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामबंधूच्या आत्मिक प्रेमाचा ऋणी

By admin | Updated: April 26, 2017 00:43 IST

माझा अमृत महोत्सवानंतरचा हा प्रथम सत्कार असून या सत्काराने माझ्या आजपर्यंतच्या सर्व कार्याची परिपूर्तता झाली आहे.

वसंत आबाजी डहाके : बेलोरा येथे नागरी सत्कारचंद्रपूर : माझा अमृत महोत्सवानंतरचा हा प्रथम सत्कार असून या सत्काराने माझ्या आजपर्यंतच्या सर्व कार्याची परिपूर्तता झाली आहे. कारण माझे बालपण गेलेल्या गावातील माझ्या ग्रामबंधूनी आत्मिक प्रेमभावानेने हा सन्मान मला दिला आहे, असे प्रतिपादन प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी केले. ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत डहाके यांचा नागरी सत्कार बेलोरा येथील गावकऱ्यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात गावातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सोबत प्राथमिक शाळेत असणाऱ्या अनेक वर्गमित्रांचा व शिक्षकांचा ज्येष्ठ नागरिकांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप होते. मुख्य अतिथी प्रा. श्याम धोपटे उपस्थित होते. बेलोरा हे गाव प्रा. वसंत हडाके यांची जन्मभूमी असून त्यांचे बालपण याच गावात गेले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. या संदर्भातून ग्रामस्थांनी ग्रामजयंती उत्सवाअंतर्गत या सत्काराचे आयोजन केले होते.प्रा. डहाके यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर स्वागताध्यक्ष व सरपंच प्रकाश खुटेमाटे, दिवाकर भोंगळे, अमोल रेगुंडवार, सचिन मोहीतकर, भाऊराव जुनघरी, प्रा.देशपांडे यांची उपस्थिती होती.अ‍ॅड. चटप यांनी प्रा. डहाके यांच्या साहित्यनिर्मितीचा आढावा घेतला. बेलोरा गावातील अनेक नागरिक आज उच्च पदावर पोहोचले असून त्यातील काही परदेशातही सेवारत आहेत. या गावातील नागरिकांनी राष्ट्रसंताची शिकवण आचरणात आणल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले. संचालन अविनाश पोईनकर यांनी तर आभार रत्नाकर चटप यांनी मानले. प्रा. अजय देशपांडे यांनी प्रा. डहाके यांच्या साहित्य निर्मितीचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोपाल शिरपूरकर, राजेंद्र घोटकर, राजू राखूंडे, जगदीश भोंगळे, प्रमोद जुनघरी, विद्या जुनघरी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)