जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६३ हजार ८६८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ४६ हजार १२५ झाली आहे. सध्या १६ हजार ७६७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ८७ हजार २३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख १८ हजार ७९५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९७६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ९०४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २९, यवतमाळ २८, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा व कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृत
चंद्रपुरातील ५२ वर्षीय महिला, बालाजी वाॅर्ड येथील ५८ वर्षीय पुरुष, एकोरी वाॅर्ड येथील ५५ वर्षीय महिला, भिवापूर वाॅर्ड येथील ५३ वर्षीय महिला, दुर्गापूर येथील ६० वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वाॅर्ड येथील ६० वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय पुरुष, तुकुम येथील ६१ वर्षीय पुरुष, नगीनाबाग येथील ५१ वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान येथील ६५ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील ३५ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, मंगरुळ येथील ६० वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील ५० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील माजरी येथील ४५ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ७२ वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरुष, मूल तालुक्यातील केळझर येथील ७० वर्षीय पुरुष.,
वणी-यवतमाळ येथील ५७ वर्षीय पुरुष, भंडारा तालुक्यातील साकोली येथील ४० वर्षीय महिला, गडचिरोली येथील ७६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र ३९०
चंद्रपूर तालुका ३८
बल्लारपूर ८१
भद्रावती ९९
ब्रह्मपुरी ४१, नागभीड ३८
सिंदेवाही २५
मूल ५७
सावली ३३
पोंभुर्णा १३
गोंडपिपरी ३०
राजुरा ०५
चिमूर ०६
वरोरा ७२
कोरपना १७
जिवती १०
अन्य १८