शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरिबांना लाभ मिळावा म्हणून सोडले अनुदान

By admin | Updated: January 19, 2017 00:52 IST

देशाला बळकट करण्यासाठी मोदी सरकारने शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांतील अनुदान सोडावे,

‘अनुदानातून बाहेर पडा’ योजना : हरदोना येथील लाभार्थ्यांना प्रथम क्रमांकसास्ती : देशाला बळकट करण्यासाठी मोदी सरकारने शासनातर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजनांतील अनुदान सोडावे, असे आवाहन देशवासीयांना केले. त्या अंतर्गत अनुदानातून बाहेर पडा या योजनेत राजुरा तालुक्यातील हरदोना गावातील लाभार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.देशाला बळकट करण्याकरिता मोदी सरकार विविध योजना राबवित आहे. त्यातील एक योजना म्हणजे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानाचा त्याग करणे ही होय. त्यात सिलेंडरवर मिळणारी सबसिडी असो की विविध योजनात मिळणारे अनुदान असो त्याचा त्याग करुन देशाच्या आर्थिक उभारणीत आपला मोलाचा वाटा ठरणार आहे. अशा प्रकारच्या जनजागृतीची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. त्या अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अनुदानातून बाहेर पडा या योजनेत सहभागी होण्याकरिता जनजागृती सुरू केली. यात राजुरा तालुक्यातील हरदोना येथील संबाशिव पिंपळशेंडे, पुरुषोत्तम मोरे, अशोक मांडवकर, मेघश्याम बोबडे, सुनिता महादेव निल या पाच शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांनी अन्नधान्याच्या अनुदानातून स्वेच्छेने बाहेर पडून या योजनेत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता कुणीही कोणत्याही मार्गाचा अवलंब करून लाभ मिळवितात. त्यामुळे खरे लाभार्थी मात्र या योजनेपासून वंचित राहतात. तर यात देशाचेही मोठे नुकसान होते. परंतु मिळणारा लाभ सोडण्याची कुणाचीही तयारी नसते. आपल्यापेक्षा अधिक गरीबांना या योजनेचा लाभ मिळावा, याकरिता कमी दराने मिळणारे धान्य नाकारुन हरदोना येथील या पाच लाभार्थ्यांनी आपले अनुदान सोेडून एक आदर्श निर्माण केला आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमामध्ये सामावून या योजने अंतर्गत नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. परंतु आता ज्यांच्या परिस्थितीत बदल झाला, अशा पात्र शिधापत्रिकाधारक नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्यापेक्षा अधिक गरीब असलेल्या नागरिकांना याचा लाभ देण्याकरिता व देशाच्या बळकटीकरिता समोर येण्याचे आवाहन विभागाने केले होते. ग्राहक दिनाचे औचित्य साधून या योजनेत सहभागी झालोल्या नागरिकांचे स्वागत तहसीलदार धर्मेश फुसाटे, सरपंच संगिता मेश्राम, उपसरपंच किसन टेकाम यांनी केली. (वार्ताहर)