शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तूर व हरभऱ्यासाठी मिळणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:25 IST

हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व चना खरेदीसाठी नोंदणी झाल्यावर मालाच्या विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचा आॅनलाईन संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

ठळक मुद्देबॅक खात्याची प्रत जमा करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व चना खरेदीसाठी नोंदणी झाल्यावर मालाच्या विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचा आॅनलाईन संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी आधार असलेल्या बँक खात्याची प्रत खरेदी केंद्रावर जमा करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.हरभरा व तूर या पिकाच्या विक्रीसाठी २०१७-१८ या हंगामाकरिता आॅनलाईन नोंदणी आवश्यक करण्यात आली होती. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणण्याकरिता संदेश पाठविण्यात आला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना हा संदेश मिळाला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करता आली नाही. परिणामस्वरूप माल पडून राहिला. काहींना खासगी व्यापाऱ्यांना मालाची कमी दरात विक्री करावी लागली. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक असलेले बँक खात्याची प्रत जोडली नसल्याने अनेकांचा निधी परत आला. त्या शेतकऱ्यांना सात दिवसात आधार क्रमांक लिंक असलेला बँक खात्याची माहिती आॅनलाइन केलेल्या केंद्रावर जमा करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती