शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:19 IST

चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या दिंदोडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु २२ शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळाले नाही. येत्या आठ दिवसात अनुदान मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : विकास कामांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या दिंदोडा प्रकल्पाचे काम सुरू झाले. परंतु २२ शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळाले नाही. येत्या आठ दिवसात अनुदान मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, माजी आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर मनपाचे नगरसेवक नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, सुनिता लोढीया, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, चंद्रपूर मनपा अंतर्गत अमृत कलश पाणी योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता त्रास होत आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाºयांना दिल्या.ही योजना २२७ कोटी ९६ लाखांची आहे. जून २०१९ रोजी कराराची मुदत संपत आहे. त्या कंपनीला चार महिने मुदत वाढवून दिली जाणार आहे.येत्या चार महिन्यात काम पूर्ण होणार असल्याची माहिती मनपा अधिकाºयांनी बैठकीत दिली. रेती घाटांच्या लिलावाला स्थगिती देण्यात आली आहे.परिणामी, व्यावसायिकांना रेती मिळणे बंद झाले. रेती घाट पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू करणे किंवा लिलावाची रक्कम परत मिळण्याकरिता शासनाकडून मार्गदर्शन मागवून कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी दिली. भद्रावती येथील जिल्हा पर्यटन निधी अंतर्गत पुरातन हनुमान मंदिर संरक्षण भिंतीच्या बांधकाम, भद्रावती झोपडपट्टीधारकांना घरकुलांचा लाभ देण्याकरिता १.६१ हे. आर. जागा न.प. भद्रावतीला हस्तांतरित करणे, आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. चंद्रपूर व आर्णी क्षेत्रातील विविध समस्यांवर या बैठकीत चर्चा झाली.या आढावा बैठकीला विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी