शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक कार्यालयाच्या चाब्या सुपूर्द

By admin | Updated: November 18, 2016 00:56 IST

जिल्ह्यातील चिमूर पंचायत समितीपासून सुरू झालेल्या ग्रामसेवकाच्या असहकार आंदोलनाने आता मोठे रूप धारण केले आहे.

आंदोलन तीव्र : ७५० ग्रामपंचायतींचा कारभार ठप्पचिमूर : जिल्ह्यातील चिमूर पंचायत समितीपासून सुरू झालेल्या ग्रामसेवकाच्या असहकार आंदोलनाने आता मोठे रूप धारण केले आहे. गुरूवारी राज्यातील सर्वच ग्रामसेवकांनी ग्रामसेवकांच्या कार्यालयातील कपाटाच्या चाब्यासह सर्वच सिक्के तालुक्यातील संवर्ग विकास अधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याप्रमाणे जिल्ह्यातील ७५० ग्रामसेवकांच्या कार्यालयाच्या चाब्या व शिक्के बीडीओच्या हातात दिले आहेत.ग्रामसेवकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक युनियनद्वारे पत्रव्यवहार सुरू होता. मात्र प्रशासनाकडून दखलच घेण्यात येत नव्हती. अनेक शासकीय योजना राबविणारा ग्रामसेवक प्रशासन व राजकीय पुढारी यांच्यामध्ये भरडला जात आहे. त्यातून अनेक ग्रामसेवकांनी आत्महत्याही केल्या असल्याचा संघटनेचा आरोप आहे. या संदर्भात शासनाला वेळोवेळी निवेदन देवूनही ग्रामसेवकांच्या मागण्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने २ नोव्हेंबरपासून प्रशासनाविरूद्ध आंदोलनाची श्रृंखला सुरू केली आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सर्वच ग्रामसेवकांनी तालुक्यातील पंचायत समितीमधील कार्यरत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे कार्यालयाच्या चाब्या व शिक्के स्वाधीन केले आहेत. चिमूर पंचायत समितीमधील ९३ ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाब्या संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक युनियनचे जिल्हा सरचिटणीस पदमाकर अल्लीवार यांच्या नेतृत्वात गुरूवारी स्वाधीन करण्यात आल्या. (तालुका प्रतिनिधी)ग्रामपंचायतींची कामे प्रभावितग्रामसेवकाच्या या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे काम प्रभावित होणार आहे. चिमूर तालुक्यातील विकास कामे व शासनाच्या योजना रखडणार आहेत.अनेक दाखल्यापासून नागरिक वंचितग्रामीण भागातील नागरिकांना रहिवासी दाखला, जातीचा दाखला, बिपिएल दाखला, जन्म-मृत्यू दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र यासह शासनाच्या अनेक योजनांचे दाखले ग्रामसेवकाच्या या आंदोलनामुळे नागरिकांना मिळणार नाहीत. गोंडपिपरीतही आंदोलनगोंडपिपरी : यापूर्वी पंचायत समितीस्तरापासून ते आयुक्तालयापर्यंत ग्रामसेवकांनी धरणे देवून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतरही समस्यांची पुर्तता झाली नसल्याने संतप्त ग्रामसेवकांनी आज राज्यभर असहकार आंदोलन केले. गुरूवारी सकाळीच ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाब्या व आपले शिक्के त्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या स्वाधिन केले. यावेळी ग्रामसेवकांच्या शिष्टमंडळाने यशवंत मोहितकर यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून समस्या त्यांपुढे मांडल्या. शिष्टमंडळात गोंडपिपरी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आशिष सुखदेवे, उपाध्यक्ष माधुरी लोखंडे, सचिव प्रमोद भोयर, हर्षवर्धन खोब्रागडे, मुकेश हजारे, मिलिंद देवगडे, भावगिता निकोडे, धनराज गेडाम, दिलीप घडले, अनिल आरके, कीर्तिमंत मंगर यांचेसह तालुक्यातील इतर ग्रामसेवकांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)