या वेळी सरपंच सीमा जगताप व उपसरपंच उमेश राजूरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन रवी बोढे यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी अतिरिक्त कार्यभार असलेले ग्रामसेवक मनोज गोरडवार, ग्रामपंचायत सदस्य मारोती कोडापे, पुरुषोत्तम कोडापे, बबन पिदूरकर, तंटामुक्त अध्यक्ष अशोक झाडे, गजानन गोबाडे, अनिल कारेकर, शुद्धोधन जगताप, जनार्धन सावरकर, नामदेव बुऱ्हाण आदी उपस्थित होते.
या वेळी ग्रामसेवक रवी बोढे म्हणाले की, जवळपास दीड वर्ष निमणी ग्रामपंचायतचा कार्यभार सांभाळला. कधीही अडचण आली नाही. भविष्यात निमणी गाव आदर्श गाव झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त केले.