शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

ग्रामपंचायतीत दारू दुकान थाटण्याचा प्रयत्न, निष्क्रिय प्रशासनामुळे संतप्त झाले गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:41 IST

चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील वहाणगाव येथील ग्रामपंचायतीने कार्यालयातच दारूविक्रीचा फलक लावून दुकान थाटण्याचा प्रयत्न केला.

राजकुमार चुनारकर चिमूर (चंद्रपूर) : तालुक्यातील वहाणगाव येथील ग्रामपंचायतीने कार्यालयातच दारूविक्रीचा फलक लावून दुकान थाटण्याचा प्रयत्न केला. तथापि, सतर्क पोलिसांनी हा प्रयत्न लागलीच हाणून पाडल्याने सोमवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण दारूबंदी करण्यात आली असली तरी गावखेड्यांमध्ये राजरोसपणे दारूविक्री सुरू आहे. वहाणगावच्या नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला निवेदने दिली; मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, प्रशासनाचा निषेध म्हणून २ सप्टेंबरला ग्रामसभा घेण्यात आली. गावातील अवैध दारूविक्री बंद करावी, अन्यथा गावकरीच देशी दारूची विक्री करतील, असा ठराव या ग्रामसभेत बहुमताने मंजूर केला होता.मात्र, प्रशासनाकडून थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे सोमवारी सकाळी ८ वाजता गावकºयांनी ग्रामपंचायत कार्यालयातच देशी-विदेशी दारूचे दुकान असा फलक लावून एकजूट दाखवत दारूविक्रीचे दुकान थाटण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांचा ताफा वहाणगावात दाखल झाला. दारू विक्रीचा फलक जप्त केला.>तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागेजोपर्यंत वरिष्ठ अधिकारी गावात येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. गावकºयांची समस्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर घालू, चर्चा घडवून आणू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.