शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' ठरावासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची तारांबळ ; धावपळीत घेतल्या ग्रामसभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 15:30 IST

Chandrapur : ग्रामसभेत केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव पारित

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : आचारसंहिता तोंडावर आहे. दसऱ्यानंतर केव्हाही लागू शकते. त्यातच रविवारी सुट्टी. अशा परिस्थितीत ग्रामसभा घेऊन तीन दिवसांत ग्रामसभेत केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव पारित करण्याचे आदेश धडकले. मात्र, अवधी कमी असल्याने हा ठराव घेण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तरीही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी हे ठराव एकदाचे पारित करून प्रशासनाच्या डोक्यावरील बोझा कमी केला आहे.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभा आयोजित करून तसे ठराव पारित करावेत, असे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले. या ग्रामसभा ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित कराव्यात असेही या आदेशात म्हटले आहे. हे आदेश शिरसावंद्य मानून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी असे ठराव पारित केले आहेत. 

पुण्याच्या पंचायतराज संचालकांनी हे आदेश ८ ऑक्टोबर २०२४ रोजी निर्गमित केले आहेत. या आदेशाचा संदर्भ देऊन नागभीड येथील गटविकास अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी तालुक्यातील सर्व सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिले. विश्वसनीय माहितीनुसार गटविकास अधिकाऱ्यांचे हे आदेश ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या हातात पडल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेची नोटीस "कागदावर" काढून ग्रामसभेच्या हजेरी बुकावर ग्रामस्थांच्या सह्या आणि अंगठ्यांची नोंद करून ठराव बुकावर केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव पारित केला व लगोलग पंचायत समितीला आदेशानुसार रवाना केला. आता पंचायत समिती हे ठराव संबंधित विभागाला सुपुर्द करणार, अशी माहिती आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर