शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

ग्रामपंचायत कर्मचारी समस्याग्रस्त

By admin | Updated: October 25, 2014 22:38 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या व उत्पन्नानुसार शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र मूल तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन

भेजगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यासाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या व उत्पन्नानुसार शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र मूल तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी जो खर्च येईल त्यासाठी एकुण खर्चाच्या ५० टक्के एवढा अनुदान शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित ५० टक्के खर्च संबंिधत ग्रामपंचायतीने करावयाचा असतो. मात्र मूल तालुक्यातील बोंडाळा बुज., बोंडाळा खुर्द, नवेगाव भुज, बेंबाळ, चकदुगाळा, भेजगाव, हळदी, पिपरी दीक्षित, चिंचाळा, ताडाळा, उथळपेठ, सुशी दाबगाव, नलेश्वर, चिरोली आदी गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वाढीव वेतन मिळत नसून मूल तालुक्यातील काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळत असल्याने ग्रा.पं. प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनावरील खर्चाबरोबरच ग्रामपंचायत निधीतून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन न देऊ शकणाऱ्या ग्रामपंचायतीकडे पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती कर आदी शिवाय उत्पन्नाची साधने नाहीत. त्यामुळे कमी उत्पन्नाच्या व कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून वाढीव अनुदान देण्याची बाब लक्षात घेऊन मंत्रीमंडळाने बैठकीत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नानुसार वाढीव अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. मात्र मूल तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वाढीव किमान वेतन मिळत नसल्याने मूल तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने एल्गार पुकारला आहे. (वार्ताहर)