शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

घोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राला मॉडेल पीएचसीचा दर्जा द्या

By admin | Updated: January 15, 2015 22:49 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मॉडेल पीएचसी बनण्यास योग्य आहे. सर्व मानकांची पूर्तता केली जात असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी

घोडपेठ: येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे मॉडेल पीएचसी बनण्यास योग्य आहे. सर्व मानकांची पूर्तता केली जात असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी बनण्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप या क्षेत्राचे जि.प. सदस्य विजय वानखेडे यांनी केला आहे.घोडपेठ हे अंदाजे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून चंद्रपूर- नागपूर महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावात प्राथमिक ते माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत, राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, एटीएम सुविधा, व्यापारपेठ आठवडी बाजार तसेच अन्य सोई-सुविधा आहेत.घोडपेठपासून अवघ्या तीन किमीच्या परिघात अंदाजे अकरा गावांचा समावेश असून या सर्वच गावातील रुग्णांना उपचारासाठी घोडपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते. त्यामुळे या आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसीचा दर्जा मिळाल्यास या परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळू शकेल.सदर आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी म्हणून कार्यान्वित करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली होती व या केंद्रास मॉडेल पीएचसी म्हणून कार्यान्वित करण्याकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र अधिकार यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला असून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास हे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे.उपरोक्त मागणीबाबत जि.प. सदस्य वानखेडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची २ जानेवारी रोजी भेट घेऊन चर्चा केली असता आरोग्य विभागात निधीची कमतरता असल्याचे कारण सांगून या विषयाला बगल देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून होत आहे. शासन आरोग्य सुविधांसाठी प्राधान्यक्रम देऊन निधी उपलब्ध करीत असताना अधिकारी मात्र याबाबतीत उदासीनता बाळगून आहेत. या अधिकाऱ्यांनी ग्रामीण आरोग्य व्यवस्था प्रभावी करण्यासाठी घोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रास मॉडेल पीएचसी बनविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अन्यथा आंदोलन उभारले जाईल, असा इशारा विजय वानखेडे यांनी दिला आहे. (वार्ताहर)