शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात सकल मराठा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:53 IST

जय जिजाऊ, जय शिवबा...एक मराठा, लाख मराठा...असा जयघोष करीत शासनाचा निषेध नोंदवत चंद्रपुरातून मराठा बहुउद्देशीय सेवा मंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी १२ वाजता सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचताच जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत सादर करण्यात आले.

ठळक मुद्देशिस्तबद्ध मोर्चा : प्रमुख मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जय जिजाऊ, जय शिवबा...एक मराठा, लाख मराठा...असा जयघोष करीत शासनाचा निषेध नोंदवत चंद्रपुरातून मराठा बहुउद्देशीय सेवा मंडळाच्यावतीने शनिवारी दुपारी १२ वाजता सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचताच जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत सादर करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण येथील गांधी चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करीत असताना मोर्चकरी जय जिजाऊ जय शिवबा, एक मराठा लाख मराठा असा जय घोष करीत होते. तसेच विविध मागण्यांच्या घोषणा देत होते. मोर्चकऱ्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. त्यावर सरकारचा निषेध असे नमुद होते. मोर्चाच्या अनुषंगाने शहर, रामनगर व वाहतुक नियंत्रण शाखेने चोख बंदोबस्त ठेवला होता.मोर्चाच्या मार्गाला जुळणारे मार्ग मोर्चा पुढे जाईपर्यंत बंद करण्यात आले होते. मोर्चामध्ये लहानमुला-मुलींसह मोठ्या संख्येने महिला व पुरुषवर्ग सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच प्रमुख मागण्यांचे निवेदन मंडळाचे अध्यक्ष सतीश कदम, कार्याध्यक्ष लिलाधर महाडीक, सचिव हरीहर भांडवलकर, संघटन सचिव प्रभाताई शितोळे, मंगला माने यांच्या शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.या मोर्चामध्ये जिवती, बल्लारपूर, चिमूर, घुग्घूस, मूल, सावली, भद्रावती व वरोरा येथील मोठ्या संख्येने मराठा समाजबंधुभगिनी आबालवृद्ध व विद्यार्थी वर्ग सहभागी होत्या.या मोर्चाच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष सतिश कदम, कार्याध्यक्ष लिलाधर महाडीक, सचिव हरीहर भांडवलकर, उपाध्यक्ष सुनिल निंबाळकर, अजय चव्हाण, संघटन सचिव सुरेश धारकर, रमेश काकडे, आकाश भालेराव, सुरेश घोडके, प्रतापराव माने, सचिन लगड, प्रविण वैद्य, प्रभाताई शितोळे, मंगला माने, प्रवीण वैद्य, महेश झिटे, इंद्रजीत देशमुख, शेषराव जगताप यांचे सहकार्य लाभले.प्रमुख मागण्याया मोर्च्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोपर्डीच्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, आंदोलनातील समाज बांधवावरील गुन्हे मागे घ्यावे व जे मृत्यूमुखी झाले त्यांच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तसेच घरातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, या मागण्यांकडे लक्ष वेधले गेले.