शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बा शासना ! गरिबांवर पुन्हा आणलीस चूल पेटविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने महिलांवर शेगडीवरून परत चुली पेटविण्याची वेळ आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. सततची वाढणारी महागाई पाठ सोडत नसल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले आहेत. संसाराचा गाडा कसा हाकलावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच सिलिंडरच्या किमतीत वाढ होऊ लागल्याने जनता त्रस्त झाली आहे. 

दीपक साबनेलोकमत न्यूज नेटवर्कजिवती : घर धूरमुक्त करण्यासाठी व जंगलतोड कमी करण्याच्या हेतूने शासनाने घरोघरी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचा मोफत पुरवठा केला. परंतु सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने महिलांवर शेगडीवरून परत चुली पेटविण्याची वेळ आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. सततची वाढणारी महागाई पाठ सोडत नसल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड केले आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगार गेले आहेत. संसाराचा गाडा कसा हाकलावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच सिलिंडरच्या किमतीत वाढ होऊ लागल्याने जनता त्रस्त झाली आहे. १०३० रुपये प्रति सिलिंडर असा दर झाला आहे. याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. या सर्व वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांना होत आहे. सिलिंडर भाववाढ ग्रामीण भागातील ग्रामस्थांना परवडणारी नसल्याने त्यांना पुन्हा एकदा शेगडीवरून चुलीकडे धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

सबसिडीही बंदशासनाकडून सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. मिळत असलेल्या सबसिडीमुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळत होता. परंतु सिलिंडरवर मिळणारी सबसिडी आता बंद करण्यात आली. सिलिंडरच्या दरात कपात करण्याची मागणी तालुक्यातील गृहिणींकडून होत आहे.

सरपणासाठी नागरिक जंगलातघरगुती सिलिंडरच्या दिवसेंदिवस वाढत्या किमतीमुळे व वाढत्या महागाईने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. गृहिणींना परत चूल पेटविण्याची वेळ आल्यामुळे चुलीसाठी लागणारे सरपण जमा करण्याकरिता जंगलतोड होऊ शकते. त्यामुळे वनविभागापुढेही जंगलतोडीचे आव्हान उभे ठाकले आहे.

परिस्थिती जेमतेम असल्याने महाग सिलिंडर विकत घेणे परवडणारे नाही. अगोदरच वाढती महागाई, त्यात सिलिंडरचे वाढते भाव यामुळे चुलीवर स्वयंपाक केल्याशिवाय इलाज नाही. या सततच्या महागाईने घर चालविणे खूप कठीण झाले आहे.              -इंदूबाई शिवदास शिनगारे, गृहिणी

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर