शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनाची वाढ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:34 IST

भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्यात आली नाही.

ठळक मुद्देरमेशचंद्र दहीवडे : केंद्र आणि राज्य सरकारने आश्वासन पाळावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजपा सरकारने ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे मोर्चा काढल्यानंतर ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात ७५० रूपये वाढ करण्याचे सरकारने घोषित केले. मात्र नोव्हेंबर महिन्यांच्या पगारात ही वाढ लागू करण्यात आली नाही. यामध्ये केंद्र शासनाचे ६० टक्के व उर्वरित राज्य शासन देण्याचे ठरले. मात्र केंद्र सरकार देत नसेल, तर आम्हीही देणार नाही, अशी भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे. ही फसवेगिरी बंद करुन केंद्र शासनाची वाढ पूर्णता द्यावी, असे आवाहन अंगणवाडी संघटनेचे अध्यक्ष (राज्य) रमेशचंद्र दहीवडे यांनी केले.अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रमेशचंद्र दहीवडे पुढे म्हणाले, सत्तेवर असलेला भाजप सरकार केवळ घोषणा करीत असतो. मात्र अंमलबजावणी शून्य आहे. त्याविरोधात अंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शोभा बोगावार, संध्या खनके, राधा सुंकरवार, पवित्रा ताकसांडे, साधना नाखले, गुजाबाई डोगे उपस्थित होते.८ जानेवारीला मोर्चाअंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीसंदर्भात संघटनेतर्फे अनेकदा अंदोलन करण्यात आले. दरम्यान केंद्र शासनाच्या मागण्यानुसार दीड हजार च्या ६० टक्के राज्य सरकार व उर्वरीत ४० टक्के राज्य सरकारला द्यावे लागेल.मात्र सद्याचे चित्र वेगळे दिसत असून शासनाने फसवेगिरी बंद करावी, केंद्र शासनाची वाढ पूर्णत: द्यावी, या मागणीला साठी ८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गांधी चौकातून प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सर्व अंगणवाडी सेविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.