शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गोवरीत आरोग्य विभागाची चमू दाखल

By admin | Updated: July 26, 2016 01:02 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी येथे चार- पाच दिवसांपासून वायरल फिरवने थैमान घातल्याचे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच ...

गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी येथे चार- पाच दिवसांपासून वायरल फिरवने थैमान घातल्याचे वृत्त रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच आरोग्य विभाग खळबळून जागे झाले. कढोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील चमूने गोवरी गावाला भेट देऊन नागरिकांची रक्त तपासणी करून वैद्यकीय उपचार केला. गोवरी येथे आरोग्य उपकेंद्र आहे. परंतु, या उपकेंद्रात सोईसुविधांचा अभाव असल्याने हे केंद्र आता अखेरच्या घटका मोजत आहे. गोवरी आरोग्य उपकेंद्रांतर्गत गोवरी, साखरी, हिरापूर, चिंचोली, पोवनी, गोवरी कॉलनी या गावाचा समावेश आहे. परंतु, या आरोग्य उपकेंद्राचा भार शेरकी नामक आरोग्यसेविकेवर आहे. इतर गावात सेवा देताना नाईलाजास्तव त्यांना आरोग्य उपकेंद्र बंद ठेवावे लागते. त्यामुळे गोरगरीब गरजू रुग्णांना उपकेंद्राच्या गेटवरुनच परत जावे लागते. येथील मलेरिया वर्कर मोरे यांची गेल्या १५ दिवसांपूर्वी बदली झाली. परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सहा गावांचा डोलारा एका आरोग्यसेविकेला सांभाळावा लागत असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागते. गोवरी येथे वायरल फिरवने ५० हुन अधिक रुग्ण खाटेवर तापाने फणफणत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच कढोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्रेहलता बडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य चमू गोवरी येथे दाखल झाली. यामध्ये आरोग्य सहाय्यक एस.ए. भटारकर, पी.आर. वाघमारे, आरोग्य कर्मचारी पी.पी. पराते, बी.जी. गोटमुखले, ए. आर. ढुमणे, गोवरी उपकेंद्रातील आरोग्यसेविका बी. शेरकी, एस.एच. ढोके, आशावर्कर आशा झाडे, बाविसकर यांचा सहभाग होता. तपासणी दरम्यान चमूला रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वांनी स्वच्छता पाळावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)