शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांचे पतीच चालवितात नगरपालिकेचा कारभार

By admin | Updated: May 18, 2016 00:52 IST

नगराध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे यांनी माझ्यावर लावलेला विनयभंगाचा आरोप धादांत खोटा असून कमिशन न दिल्याच्या कारणावरून चिडून पिंपळशेंडे यांनी

१५ लाखांच्या मागणीसाठी झाला वादकंत्राटदार म्हणतात, माझ्यावर लावलेले आरोप खोटे वरोरा : नगराध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे यांनी माझ्यावर लावलेला विनयभंगाचा आरोप धादांत खोटा असून कमिशन न दिल्याच्या कारणावरून चिडून पिंपळशेंडे यांनी माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार केली, असा आरोप कंत्राटदार अमोल सोनेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबतचा आॅडिओ व व्हिडिओ त्यांनी पत्रकार परिषदेत सादर करून चांगलीच खळबळ उडवून दिली. नगरपालिकेला कारभार नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांचे पती मंगल पिंपळशेंडे व स्वीकृत सदस्य राजू महाजन हेच चालवित असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. कुणाला किती कमिशन दिल्या जाते व नगरपालिकेमध्ये होत असलेल्या भोंगळ कारभाराबद्दलही त्यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावेही सादर केले.२०१६-१७ चे विद्युत विभागाचे कंत्राट अमोल सोनेकर यांना मिळाले. एक कंत्राट परस्पर रद्द करण्यात येऊन दुसऱ्या कंत्राटाबाबत तडजोड करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या सहीनिशी पत्र ही देण्यात आले. तडजोड करण्याकरीता १३ एप्रिलला गेलो असता, मुख्याधिकारी अनुपस्थित होते. विद्युत विभागाचे वाकुलकर यांना विचारणा केली असता साहेब नसल्याने तडजोडीचे पूर्ण हक्क नगराध्यक्षांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही नगराध्यक्षांना भेटा असा सल्लाही त्यांनी दिला. पत्र देवून मुख्याधिकारी तडजोडसाठी आयोजित बैठकीला जाणूनबुजून ते गैरहजर असल्याचा आरोपही अमोल सोनेकर यांनी केला आहे.तडजोड करण्याकरिता नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांच्या दालनात गेलो असता त्याठिकाणी नगराध्यक्षांचे पती मंगल पिंपळशेंडे, स्वीकृत सदस्य राजू महाजन, नगरसेवक पुरुषोत्तम खिरटकर व इतर नगरसेवक तिथे बसले होते. नगराध्यक्षांनी मला त्यांच्या समोर तडजोड करायला लावली. तुम्ही जुन्याच दराप्रमाणे काम करा अन्यथा हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात येईल, असे नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांनी मला बजावून सांगितले, असे सोनेकर म्हणाले. तुम्ही सहीनिशी तसे लिहून द्या मी काम करायला तयार आहे असे म्हणताच मागे बसलेले नगराध्यक्ष जनाबाई पिंपळशेंडे यांचे पती मंगल पिंपळशेंडे चिडले. तुझ्या दबावासाठी नगराध्यक्ष बनविले का, असा सवाल त्यांनी उपस्थित करून नगराध्यक्ष पत्नीला कंत्राट रद्द करण्याचे फर्मान सोडले. तसे पत्र तयार करण्याबाबतही त्यांनी जनाबाईला सांगितले. त्यांच्याच सुरात सूर मिसळून नगरसेवक पुरुषोत्तम खिरटकर, स्वीकृत सदस्य राजेश महाजन यांनीही निवेदा रद्द करण्याबाबत सांगितले. जुन्या दरा प्रमाणे काम करण्यास तयार असतानाही निविदा रद्द करण्याची धमकी दिल्याने मी तडजोड करायला तयार आहे, असे सांगितले. तडजोडीचे सर्व अधिकार हे मुख्याधिकारी यांचेकडे असतात. मी त्यांच्याशी बोलतो असे म्हणताच मुख्याधिकाऱ्यांनी तुम्हीच तडजोड करा, असे सांगितल्याचे जनाबाई पिंपळशेंडे यांनी सांगितले, अशी माहिती अमोल सोनेकर यांनी पत्रकारांना दिली.अब्रु नुकसानीचा दावा करणार-राजू महाजनकामाचे कंत्राट न मिळाल्याने बदला घेण्यासाठी अमोल सोनेकर यांनी नगराध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचा विनयभंग केला. त्यांच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हेही दाखल झालेत. त्यामुळे सोनेकर यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. जनाबाई पिंपळशेंडे यांच्याशी असलेल्या वादात मला गोवण्यात येत असल्याने मी सोनेकर यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे स्वीकृत सदस्य राजू महाजन यांनी सांगितले.