चंद्रपूर : २००९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याचा कौल बहाल करत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मला विधानसभेत पाठविले. या मतदार संघातील जनतेच्या प्रेमाची परतफेड मी कधीही करु शकणार नाही. जनतेचा आशीर्वाद घेवून मी पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करीत आहे. महाराष्ट्रात भाजप व मित्रपक्षांच्या युतीचे सरकार सत्तारुढ होईल, असा विश्वास भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. २६ सप्टेंबर शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल येथे सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेला सुधीर मुनगंटीवार यांनी संबोधित केले. यावेळी खा. हंसराज अहीर, नाना श्यामकुळे, सपना मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, विजय राऊत, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, भाजपा नेते प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, वनिता कानडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, देवराव भोंगळे, संजय गजपुरे, रामपाल सिंह, अजय जयस्वाल, माजी जि.प. अध्यक्ष संतोष कुमरे, रेणुका दुखे, अंजली घोटेकर, ब्रिजभूषण पाझारे, मूलच्या नगराध्यक्ष रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रविण मोहुर्ले, प्रभाकर भोयर, चंदु मारगोनवार, नंदू रणदिवे, चंद्रकांत आष्टनकर, किशोर पंदिलवार, रमेश पिपरे, राजू बुद्धलवार, बल्लारपूर पं.स. च्या सभापती चंद्रकला बोभाटे, गजानन गोरंटीवार, अल्का आत्राम, वर्षा परचाके, रेखा गद्देवार, सुनील आयलनवार, पोंभूर्णा पंचायत समितीचे सभापती बापूजी चिंचोलकर, उपसभापती महेश रणदिवे, गजानन वलकेवार, हनुमान काकडे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. भाग्यरेखा सभागृह येथून रॅली काढण्यात आली. जीपमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह खा. हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे व भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना अभिवादन करीत रॅली उपविभागीय कार्यालय येथे पोहचली. त्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी खजांची यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. (स्थानिक प्रतिनिधी)
राज्यात भाजप व मित्रपक्षांचेच सरकार सत्तारुढ होईल
By admin | Updated: September 27, 2014 01:23 IST