शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती पालिकेला शासनाने त्वरित निधी द्यावा

By admin | Updated: March 3, 2016 01:11 IST

जिल्ह्यातील ११ नगरपालिका व नगर पंचायतीला वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी १२७ कोटीचा निधी शासनातर्फे वितरीत करण्यात आला.

भद्रावती : जिल्ह्यातील ११ नगरपालिका व नगर पंचायतीला वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी १२७ कोटीचा निधी शासनातर्फे वितरीत करण्यात आला. मात्र यातून भद्रावती नगर पालिकेला जाणीवपूर्वक वगळण्यात आले. हा भद्रावतीकरांवर अन्याय असून शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२७ कोटी पैकी तब्बल ७२ कोटी रुपये स्वत:च्या क्षेत्रात वाटले. निधी वाटपात दुजाभाव करणे बरोबर नसल्याचा आरोप करीत शासनाने भद्रावती नगरपालिकेला त्वरीत निधी द्यावा, अन्यथा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राजू गैनवार यांनी दिला.सन २०१५-१६ या वर्षासाठी राज्य शासनातर्फे वैशिष्टये पूर्ण कामासाठी अनुदान योजने अंतर्गत निधीचे वाटप करण्यात आले. यात चंद्रपूर महानगर पालिका ४० कोटी, बल्लारशाह ३० कोटी, बल्लारपूर पोलीस ठाण्यासाठी १० कोटी, बल्लारपूर क्रीडा संकूल ५ कोटी, मूल २० कोटी, गडचांदूर २ कोटी, वरोरा ३ कोटी, चिमूर २ कोटी, राजुरा १ कोटी, पोंभूर्णा ५ कोटी, पोंभूर्णा क्रीडा संकूल २ कोटी, सावली २ कोटी, ब्रह्मपुरी ५ कोटी रुपयाचा निधी देण्यात आला. मात्र भद्रावती नगर पालिकेचा प्रस्ताव असताना सुद्धा पालिकेला एकही रुपयाचा निधी देण्यात आला नाही. त्यामुळे या शहरावर शासनाचा अन्यायच झाला आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भद्रावती शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे आयुधनिर्माणी, एनटीपीसी वेकोलिच्या भूमीगत, खुल्या कोळसा खाणी, तसेच वरदविनायक गवराळा मंदिर, भद्रनाग स्वामी, जैन धर्मियांचे पार्श्वनाथ मंदिर, बौद्ध धर्मियांचे बुद्ध लेणी, असे त्रिवेणी संगमाने वसलेले हे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. नगरसेवक राजू गैनवार यांनी पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे निधी न मिळण्याच्या संदर्भात चौकशी केली असता, ही माहिती मिळाली. निधी अभावी शहरातील विविध कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरीत १५ दिवसात भद्रावती नगर पालिकेला निधी द्यावा अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू गैनवार यांनी दिला. पालकमंत्र्यांनी याची दखल घेण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)