शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन ठेव्याबाबत सरकार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:41 IST

चंद्रपूर ही प्राचीन नगरी आहे. गोंडराजाच्या काळातील अनेक प्राचीन वास्तू येथे आहेत. चंद्रपुरातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्मारके, परकोट याची दूरवस्था होत आहे. मात्र आता या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार गंभीर झाले आहे.

ठळक मुद्देलवकरच दुरुस्ती : हंसराज अहीर यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर ही प्राचीन नगरी आहे. गोंडराजाच्या काळातील अनेक प्राचीन वास्तू येथे आहेत. चंद्रपुरातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक स्मारके, परकोट याची दूरवस्था होत आहे. मात्र आता या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार गंभीर झाले आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. चंद्रपूरमधील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास नागरिकांचा पुढाकार उल्लेखनीय असून सरकार सवोर्तोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन ना. डॉ. महेश शर्मा यांनी या ैबैठकीत दिल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेल्या या बैठकीत चंद्रपूर किल्ला परकोट, गोंडराजे समाधी स्थळ सौंदर्यीकरण, ऐतिहासिक गोंडराजे राजमहल (सध्याचे जिल्हा कारागृह), सराई इमारत, रामाळा तलाव, पुरातत्व विभागाचे संग्रहालय, जुनोना जलमहल, भद्रावती विजासन लेणी, संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथील किल्ला आदी विषयावर सकारात्मक निर्णय झाले.किल्ला व संरक्षण भिंत यामधून पाथ वे, सायकल ट्रॅक चा प्राक लॅन तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गोंडराजे समाधी स्थळ येथे उद्यान आणि लाईट, साऊंड शो करिता आवश्यक कामे विभाग करेल व गरज असल्यास इतर संस्थांना काम करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही या बैठकीत ठरले. जुनोना जलमहल विभागाकडे घेणे आणि सौंदर्यीकरण करणे, सराई इमारतीचे जतन करण्यास तांत्रिक सहकार्य भारतीय पुरातत्व विभाग देणार असे ठरले. पुरातत्व विभागाकडूण बांधकाम करण्यात येणार असून संग्रहालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.विशेषत: चंद्रपूरमधील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याकरिता बोलाविण्यात आलेल्या या महत्वपूर्ण बैठकीस ना. हंसराज अहीर यांच्यासह सांस्कृतिक पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा, खात्याचे सचिव, भारतीय पुरातत्व विभागाच्या महानिदेशक डॉ. उषा शर्मा, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, बिमल शहा, जानबीज शर्मा, टी. जे. अलोने, पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. इजराइल हाशमी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.दोन टप्प्यात ३४ कोटीचंद्रपूर येथील पाचशे दिवसांपासून सुरु असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने तुटलेल्या किल्ला भिंत व बुरुजे यांची त्वरित दुरस्ती करण्याकरिता टप्प्याटप्पाने बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले. किल्ल्याच्या सभोवताल सुरु असलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाला गती देण्यासाठी दोन टप्प्यात ३४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचे यावेळी ना. अहीर यांनी सांगितले.केंद्रीय समिती करणार पाहणीशहरातील कारागृह इतरत्र हलवून गोंडराजे राजमहल संवर्धन करून पर्यटनदृष्टया संपूर्ण परिसराचा विकास करण्याबाबत लवकरच केंद्रीय समिती पाहणी करणार आहे. सोबतच ही समिती इको-प्रो किल्ला स्वच्छता अभियान, जटपुरा गेट, जुनोना जलमहल, सराई इमारत, संग्रहालयाची पाहणी करणार आहे, अशी माहितीही ना. अहीर यांनी दिली.