मूल :
विदर्भातील पहिले व महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा.कन्नमवार यांची १२१वी जयंती मूल शहरात युवा बेलदार मित्र परिवार मूलच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी मा.सा.कन्नमवार यांच्या कार्याचे महत्व सदैव आठवणीत राहावे, या उदात्त हेतूने मूल शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालयात मा. सा.कन्नमवार यांच्या फोटोची प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच जयंतीचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू साखालकर यांच्याकडूून मूल शहरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप कारमवार,राजेद्र कन्नमवार विवेक मुत्यलवार, डाॅ.अजय गड्डमवार, बंडू साखलवार, महेश गाजुलवार,सचिन बोर्डावार, शैलेश देशटीवार, सुशांत अरगेलवार, सोमेश्वर रेड्डीवार, संदीप आलेवार, दीपक बोर्डावार आदी उपस्थित होते.