शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

२०११ पूर्वीचे शासकीय अतिक्रमण नियमित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:36 IST

ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणधारकांना दिलासा : मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात शेकडो नागरिकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधली. ही घरे हटविण्यासाठी प्रशासनाने अनेकदा नोटीसा पाठविल्या होत्या.पोलिसांच्या मदतीने कारवाईचा इशाराही दिला. मात्र अतिक्रमणधारकांनी जमिनी सोडल्या नाही. या जमिनीवरून नागरिकांना हटविल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या भितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनीही अतिक्रमणधारकांवर कारवाई केली नाही.अतिक्रमण करणाºया नागरिकांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील नागरिकांचीच संख्या अधिक आहे. यामुळे शासनाने काही अटींवर १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रम नियमित करण्याचा निर्णय घेतला. गायरान, सार्वजनिक वापरातील जमीन, वनक्षेत्र आणि ज्या जमिनीवर वास्तव्य करणे शक्य नाही, अशा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.सदर जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण त्याच ठिकाणी नियमित केले जाणार आहे. याकरिता प्रशासनाने मोबाईल अ‍ॅपद्वारे माहिती संकलन करण्याचे काम सुरु केले.माहिती संकलित झाल्यानंतर विश्लेषण आणि त्यानंतर पात्र नागरिकांच्या प्रकरणांचा निपटारा करून कालबद्ध कृती कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.असे असेल जमिनीवरील शुल्कज्या कुटुंबीयांच्या काही सदस्यांच्या नावाने त्याच ग्रामपंचायत क्षेत्रात घर आहे. असे कुटुंब जर १ जानेवारी २००० पूर्वीपासून अतिक्रमण करून राहत असतील तर प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किमतीप्रमाणे आणि जर १ जानेवारी २००० नंतर मात्र जानेवारी २०११ पर्यंत अतिक्रमण करून राहत असल्यास प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किमतीच्या दीडपट शुल्क आकारून पर्यायी जागेचे वाटप करण्यात येणार आहे.