शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचारी रस्त्यावर

By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले.

शासकीय कार्यालये, बँका बंद : मोर्चात शेकडो कर्मचारी सहभागीचंद्रपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले. त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष लोटली. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला. त्यानंतर मोर्चा काढून शासकीय धोरणाचा निषेध केला.या मोर्चाला अनेक शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती, सेंटर आॅफ इंडीयन ट्रेड युनीयन (सिटू), कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी समिती संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राष्ट्रीयकृत बँका व वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होत आपला रोष व्यक्त केला. आज शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येथील गांधी चौकातून विविध कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एकापाठोपाठ एक कर्मचारी संघटना मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या व सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. सदर मोर्चाला समर्थन देण्यासाठी कामगार नेते व माजी खासदार नरेश पुगलियादेखील काही अंतरापर्यंत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अमृत मेश्राम, महासचिव विश्वनाथ आसई, अशोक वडनेकर, मोहम्मद ताजुद्दीन, बबनराव पवार, अतिन घोष, किशोर बाराहाते, सुरेश पाटील, देवनाथ वासुर्के, विठ्ठल नगराळे, चंदा मेंढे, मधुकर भरने, वामन बुटले, निता घोष, भिमप्रकाश उराडे यांच्यासह विविध कार्यालयातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान, कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. (शहर प्रतिनिधी)बंदमुळे नागरिकांची गैरसोयशासकीय कर्मचाऱ्यांच्या या लाक्षणिक संपामुळे आज अनेक कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. आरोग्य कर्मचारीही या संपात सहभागी असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली. बँक कर्मचारीही संपावर असल्याने बँकेतील कोट्यवधींचा व्यवहार आज ठप्प होता. अशातच अनेक एटीएम केंद्रातही पैसे नसल्याने ऐन पोळा सणाच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.