शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:15 IST

ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासोबतच काळानुसार सेवांमध्ये बदल केल्या जात आहेत. ग्रामीण व शहरी समुदायाला जोडून दळवळणाची साधने अत्याधुनिक करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ते शिर्डी शिवशाही शयनयान फेरीच्या शुभारंभाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूर ते शिर्डी शिवशाही बसचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासोबतच काळानुसार सेवांमध्ये बदल केल्या जात आहेत. ग्रामीण व शहरी समुदायाला जोडून दळवळणाची साधने अत्याधुनिक करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर ते शिर्डी शिवशाही शयनयान फेरीच्या शुभारंभाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.चंद्रपूर बसस्थानकात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक पाटील, वाहतूक अधिकारी तरोडे, यंत्र अभियंता हेडावू, कामगार अधिकारी शंभरकर, आगार व्यवस्थापक डफरे आदींची उपस्थिती होती. शनिवारपासून सुरू झालेल्या शिवशाही बसमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना आता थेट शिर्डीला जायला मिळणार आहे.शिवशाही बसेसला ४ थांबे देण्यात आले आहेत. चंद्रपूरच्या आगारातून ही बस दररोज दुपारी ३ वाजता सुटेल.दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० ला शिर्डी येथे पोहचणार व शिर्डी आगारातून सायंकाळी ५.३० सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता चंद्रपूरला पोहचेल. ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद जोपासणाऱ्या  एसटी महामंडळाने दिवाळीच्या शुभपर्वावर चंद्रपूर ते शिर्डी शयनयान बससेवा सुरु करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली होती.शनिवारीवारपासून सदर बससेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांना शिर्डीपर्यंतचा प्रवास करणे सोईस्कर झाले आहे.बसचे प्रवासभाडे चंद्रपूर ते शिर्डीसाठी दोन हजार पाच रुपये, जेष्ठ नागरिकांकरिता एक हजार ४३० रुपये राहणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली.विकासाकरिता मुबलक निधीजिल्ह्यातील कोट्यवधी रूपयांची विकासकामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली. शासनाने निर्धारित केलेल्या कालावधीत विकासकामे पूर्ण व्हावीत, याकरिता निधीची कमतरता पडू दिल्या जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी दिली. यावेळी विभाग नियंत्रक पाटील यांनी मंडळाच्या प्रगतीची माहिती सादर केली.