शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Updated: September 1, 2015 00:44 IST

केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

रावसाहेब दानवे : विदर्भ निर्मितीसाठी शासन सकारात्मक मूल : केंद्र शासनाबरोबरच राज्य सरकारदेखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून केंद्र शासनाने ५०० कोटी तर राज्य शासनाने ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुष्काळाचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना ९५० कोटी रुपये मदत वितरीत केली जाणार आहे. गुरांना चारा, पिण्याचे पाणी, कर्जाचे पुर्नगठन, वीज बिल स्थगिती व विद्यार्थी फी माफी आदीची पूर्तता करण्यात येणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमनाथ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया आदी उपस्थित होते.रावसाहेब दानवे पुढे म्हणाले, केंद्र शासन छोट्या राज्याच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असून विदर्भ निर्मितीच्या पाठिशी आहे. मात्र अभ्यासपूर्व स्थिती जाणल्यानंतरच निर्णय घेतला जाईल,.भाजपाने संघटन पर्व जाहीर केले असून त्याची ४ भागात विभागणी केली आहे. पहिल्या विभागात सदस्य नोंदणीमध्ये एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. यात एक कोटी ५ लाख सदस्य नोंदणी झाले आहे. दुसऱ्या विभागात घरी जाऊन त्याची ओळख करणे, तिसऱ्या विभागाात प्रशिक्षण असून राज्यात ७०० प्रशिक्षण वर्ग घेऊन एक लाख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणार तर चवथ्या विभागात निवडणुका असून केंद्र, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर संघटनात्मक निवडणूक घेऊन भाजपा पक्ष समक्ष करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मराठा, विदर्भ व प. महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून सरासरी पेक्षा ५० टक्केपेक्षा कमी पाऊस पडल्यावरच दुष्काळ जाहीर केला जात होता. मात्र सरकारने निकष बदलविला असून तो ३३ टक्क्यावर आणला आहे. यासाठी मंत्री, खासदार, आमदारसुद्धा गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेबाबत धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून गोसीखुर्द प्रकल्पाला गती देण्याचे काम भाजप सरकार करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. नवे जिल्हे अथवा तालुके निर्मितीचा कसलाही प्रस्ताव सध्यातरी राज्य सरकारपुढे नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)