शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गाव विकासासाठी शासन कटिबद्ध

By admin | Updated: August 26, 2014 23:22 IST

ग्रामीण विकासासाठी जनतेने शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतोय ग्रामीण भागाच्या विकासासाठी

सुभाष धोटे यांचे मनोगत : चनाखा-पंचाळा रस्ता कामाचे भूमिपूजनचंद्रपूर : ग्रामीण विकासासाठी जनतेने शासनाच्या विविध योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतोय ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी चनाखा येथे केले. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०१४-१५ अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील १० लाख रुपये खर्चाच्या चनाखा ते पंचाळा रस्त्याचे भुमिपूजन मंगळवारी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला चनाखाच्या सरपंच शोभा लोखंडे, उपसरपंच विकास देवाळकर, ग्रा.पं. सदस्य कमलेश सातपुते, रेखा आकनुरवार, रेखा सातपुते, आनंदराव गावंडे, सरपंच पंचाळा, उपसरपंच मंगेश मडावी, माजी सरपंच सुधाकर गिररसावळे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोज किटे, शशिकांत वडस्कर, पांडूरंग सातपुते, भाऊराव आकनुरवार, संदीप सातपुते, संतोष बोबडे उपस्थित होते.चनाखा गावाच्या विकासासाठी मागील पाच वर्षांत आमदार सुभाष धोटे यांनी विविध योजनांअंतर्गत बंधारे बांधकामासाठी १० लाख, शिवार रस्ता पाच लाख, नागोबा साळवे यांच्या घराजवळील सिमेंंट रस्त्यासाठी पाच लाख, बोबडे यांच्या घराजवळील सिमेंंट रस्त्यासाठी दोन लाख, बेघर दलित वस्तीसाठी चार लाख, दलित वस्ती सामाजिक सभागृहासाठी सात लाख, इंदिरा आवास योजनेअंतर्गत २० घरकूलांसाठी १५ लाख, सात शेतकऱ्यांना सिंचनासाठी जवाहर विहिर योजनेअंतर्गत सात लाख, दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी टंचाईअंतर्गत दोन लाखांची ट्युबवेल असा ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिली. चनाखा ते पंचाळा या दुर्लक्षित रस्त्याची मागील २० वर्षांपासून दयनिय व बिकट परिस्थिती होती. सदर बाब आमदार सुभाष धोटे यांनी गांभीर्याने घेवून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करुन घेतला. त्या निधीअंतर्गत रस्ता बांधकामाचे भुमिपूजन पार पडले. गावाच्या विकासासाठी आमदार धोटे यांनी केलेल्या विकास कार्याची प्रशंसा गावकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)