शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विकास व लोकाभिमुख कामासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:35 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात, त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, त्या इमारती निर्जीव राहू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार विकासाच्या व लोकाभिमुख कामाकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : वरोरा येथे प्रशासकीय भवनाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात, त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, त्या इमारती निर्जीव राहू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार विकासाच्या व लोकाभिमुख कामाकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते वरोरा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, माजी मंत्री संजय देवतळे, जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, पं. स. सभातपी रोहिनी देवतळे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, उपसभापती विजय आत्राम, उपविभागीय अधिकारी संजय बोदेले, नगरसेवक बाबा भागडे, आदी उपस्थित होते. वरोरा, भद्रावती तालुक्यातील विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. हे क्षेत्र विकसित होणे गरजेचे आहे. त्याकरिता पक्षाच्या भिंतीपलीकडे जावून एकत्र येणे आवश्यक आहे. विकासाकरिता मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत, वरोरा पंचायत समितीची नवीन इमारत सुसज्ज करण्याकरिता एक कोटी रूपये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.याप्रसंगी पंचायत समिती सभापती रोहिनी देवतळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापतींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांनी तर संचालन प्रमोद तुराणकर यांनी केले.पावसामुळे सरपंचांची अडचणपंचायत समिती वरोरा येथील प्रशासकीय इमारतीने उद्घाटनाला बराच विलंब लागला. पाऊस पडत असल्याने निमंत्रित सरपंचांना बसण्याकरिता जागेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे सरपंच संतप्त झाले होते. त्यांनी नियोजनाबाबत जि. प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाने मांडले.पालिकेच्या कामांचे उदघाटन झालेच नाहीवरोरा न. प.च्या वतीने दोन कामांचे उद्घाटन नियोजित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. याकरिता फलक लावून सुसज्ज तयारी करण्यात आली. परंतु, उद्घाटन करण्यात आले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने उद्घाटनाचे फलक रात्रीच काढून घेतले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार