शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचे पाणी कोकलपार तलावात सोडण्यात यावे

By admin | Updated: June 8, 2016 00:44 IST

गोसेखुर्द धरणाचे पाणी तालुक्यातील कोकलपार तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी केली असून ...

अविनाश पाल: सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदनसावली: गोसेखुर्द धरणाचे पाणी तालुक्यातील कोकलपार तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे.सावली तालुक्यातील निमगाव या गावांतर्गत येणाऱ्या धानारी शेतीचे क्षेत्रफळ अंदाजे ३५०.०० हेक्टर आर आहे आणि शेतीला पाणी पुरवठ्यासाठी कोकलपार येथील मालगुजारी तलाव आहे. परंतु या तलावाखाली येणाऱ्या शेतीच्या क्षेत्रफळानुसार या तलावचे पाणी अपुरे पडत आहे. या तलावांतर्गत येणाऱ्या शेतातील पिके पाण्याअभावी दरवर्षी सुकून जातात. या तलावाखाली येणारा शेतकरी हा अल्पभूधारक असून याच शेतीच्या भरोशावर त्यांची उपजिविका अवलंबून आहे. मागील १० वर्षांपासून या तलावाखालील शेती पाण्याअभावी सुकत असल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाण्याअभावी दरवर्षी शेती मरत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या तलावापासून गोसीखुर्द धरणाचा कालवा अंदाजे २ किलोमिटर अंतरावर असून सदर कालव्याला जोडून एक कालवा या तलावात दिल्यास येथील तलावात पाणी येण्यास कसलीही अडचण भासणार नाही. या धरणाच्या पाण्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतात पीक घेवून आपली उपजिविका भागवू शकतील.राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून निमगाव पाणलोटअंतर्गत येणाऱ्या कोकलपार तलावात गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्यास तेथील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येवून शेतकरी सुजलाम् सुफलाम् बनतील व शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी मिळेल.गोसीखुर्द तलावाचे पाणी कोकालपार तलावात सोडण्याची मागणी भाजपाचे सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, भाजयुमो सावली तालुका महामंत्री पुनम झाडे, उपसरपंच गुरुदास ढोले, सदस्य रामदास झाडे, शालू लाटकर सरिता झाडे, संतोष थोराक, अनिल राजगडे, लोमेश गेडाम, अभय लाटकर, डॉ. ठाकूर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)