शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचा नहर ठरला मृत्यूचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:21 IST

गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यासाठी मृत्यूचा घाटच ठरला आहे. बुधवारी या उपकालव्यात बुडून नवेगाव पांडव येथील एका इसमाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देनवेगाव पांडव येथील इसमाचा बुडून मृत्यू : आतापर्यंत सात जणांना बळी

घनश्याम नवघडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागाभीड : गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यासाठी मृत्यूचा घाटच ठरला आहे. बुधवारी या उपकालव्यात बुडून नवेगाव पांडव येथील एका इसमाचा मृत्यू झाला. हा आजपर्यंतचा तालुक्यातील सातवा बळी आहे.गोसेखुर्द धरणाचा मुख्य उजवा कालवा ब्रम्हपुरी तालुक्यातून आसोला मेंढा तलालाकडे गेला आहे. या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून मौशीमार्गे नवेगाव पांडव येथून घोडाझरीकडे गेला आहे. या कालव्याच्या माध्यमातून नागभीड तालुक्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असे अगोदर सांगण्यात येत होते. असे असले तरी नागभीड तालुका तांत्रिक कारणांमुळे पाण्यापासून वंचितच आहे.या उपकालव्याचे काम सलगपणे पूर्ण झाले नाही. खंड खंड स्वरूपात कालव्याचे काम झाले असल्याने या कालव्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आठ नऊ वर्षापूर्वी या उपकालव्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र दरम्यानच्या काळात शासनाने या कालव्याबाबत हात आखडते घेतल्याने कालव्याचे काम बंद पडले आहे. त्यामुळे हा कालवा लोकांच्या जीवावर उठला आहे.या कालव्याने केवळ नागभीड तालुक्यातीलच आतापर्यंत ७ लोकांचा बळी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मौशी येथे आतापर्यंत ३ तर नवेगाव पांडव येथे ४ लोकांचा बळी गेला आहे. मौशी येथील दीपक धनराज देशमुख, दुर्गेश कमलाकर मिसार आणि प्रज्वल विनोद ठाकरे यांचा तर नवेगाव पांडव येथील कमलेश राहाटे, कुमार पांडव, मोरेश्वर विठोबा तिजारे आणि लक्ष्मण मारोती सालोरकर हे चार जण नहराचे बळी ठरले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.पाय घसरल्याने गेला जीवनवेगाव पांडव येथील लक्ष्मण मारोती सालोरकर (५५) हे गोसीखुर्द धरणाच्या घोडाझरी उपकालवा परिसरात फिरायला गेले होते. ते परत येत असताना पाय घसरल्याने कालव्यात पडले. यात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटना लक्षात येताच नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते निष्फळ ठरले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसही लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि पोहणाऱ्यांच्या मदतीने लक्ष्मणचा शोध घेण्यात आला. मात्र त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मृतदेहच सापडला.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प