शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:56 IST

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठे नुकसान : शंभर हेक्टर शेती पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी कालव्याची पाळ फुटल्याने शंभर हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली आले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण व नायब तहसीलदार निलेश खटके यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती सुधारल्यानंतर पंचनामा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या धान रोवणी करण्याचे काम सुरु आहे. लाखापूर भागात रोवणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाळ फुटल्याने पिकांच्या आशेवर जगणाºया शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नहर फूटण्याच्या घटना या विभागात निरंतर घडत आहे. काही दिवसांपूर्वी तोरगाव (खुर्द) येथील शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र प्रशासनाने कोणतेही प्रतिबंधक उपाय योजना केल्या नाही. त्यानंतर पुन्हा बुधवारी लाखापूरशेजारील नहर फूटला. या पाण्यामुळे विनोद राऊत, जयपाल राऊत, अनमोल राऊत, स्मिता राऊत, बबन ढोरे, नरेश डोंगरवार, पांडुरंग राऊत, गुंजनराव राऊत, कौशल्य वलके, रवींद्र शेंडे आदी शेतकºयांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी नहराच्या निकृष्ट कामाविषयी वारंवार तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने याविषयी गंभीर दखल न घेतल्याने नहराची पाळ फूटून शेतजमीन पाण्याखाली आली. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करून नुकसान भरपाईची मागणी शेतकºयांनी प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प