शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द नहराची पाळ फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:37 IST

शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे.

ठळक मुद्देअतोनात नुकसान : हजारो हेक्टरवरील धान पीक पाण्याखाली

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. परंतु कंत्राटदाराने पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे मंगळवारी कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पीक पाण्याखाली आले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतात प्रामुख्याने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान पीक गर्भाशयात असताना पाण्याची नितांत आवश्यकता असते. प्रशासनामार्फत गोसेखुर्दच्या उजव्या कालव्यांतर्गत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे शेतीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल व गर्भाशयात असलेले धान पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल, अशा आशेत बळीराजा होता. गोसेखुर्दच्या कर्मचाऱ्यांकडून प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. कंत्राटदाराने उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात कालव्याची पाळ फुटून हजारो हेक्टरवरील धान पीक क्षणार्धात पाण्याखाली आले. त्यामुळे तालुक्यातील तोरगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदीड, मूग, लाखोळी व तुरीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाºया खडतकर कन्स्ट्रक्शन नागपूर यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.मुरुमामुळे शेताची प्रत खराबगोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याची पाळ फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मुरूम गेले असून शेतजमीन निरोपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच छोट्या कालव्यामध्ये मुरूम गेल्यामुळे छोटा कालवा पूर्णत: दिसेनासा झाला आहे.तहसीलदारांनी दिली घटनास्थळी भेटसदर उजव्या कालव्याची पाळ फुटल्याची माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सर्व्हेक्षण करून पंचनामा करण्याचा तलाठ्यांना आदेश दिला. त्यानंतर तलाठी मून, आकूलवार व कोतवाल अमित मेश्राम यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी महेश पिलारे, विनय पारधी, श्रीकृष्ण पारधी, नामदेव बुल्ले, सुनील राऊत आदी नुकसानग्रस्त शेतकरीही उपस्थित होते.यापूर्वीही पाळीवर पडले होते भगदाडयापूर्वीसुद्धा याच कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याच्या नहराच्या पाळीवर मोठे भगदाड पडून छोट्या कालव्याद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद झाला होता. त्यामुळे शेतकºयांची पिके करपण्याच्या मार्गावर होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यावर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.