शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:25 IST

ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल, त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरात आयुष्यमान योजनेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्या देशाचे आरोग्य उत्तम असेल, त्या देशाच्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गावागावात उत्तम आरोग्याचे आंदोलन राबवण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे केले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रांची येथे या योजनेचे लोकार्पण केले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ना. मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी नियोजन भवनात करण्यात आले. कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, आमदार नाना श्यामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे आदी उपस्थित होते.पालकमंत्री पुढे म्हणाले, सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टपूर्तीसाठी आयुष्यमान भारत योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्याची उपलब्ध स्थिती म्हणजे ८० टक्के लोकांसाठी २० टक्के तोकडी आरोग्य यंत्रणा आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून खासगी आरोग्य यंत्रणादेखील सामान्य लोकांच्या सेवेत येणार आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील बांधवांसाठी उपयोगाची ठरणार आहे. महाराष्ट्रात या योजनेसोबतच महात्मा फुले जन आरोग्य योजनाही एकत्रित राबविली जाणार आहे. त्यामुळे जवळपास सगळ्या लोकांना आरोग्य विम्याचे कवच मिळणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी ना. हंसराज अहीर यांनी भारताच्या या योजनेची जगभरात चर्चा होईल व यातून ग्रामीण भारताच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल, अशी आशा व्यक्त केली.