आॅनलाईन लोकमतराजुरा : असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्हीचा प्रसार सर्वात मोठ्या प्रमाणावर होतो. एचआयव्ही बाधितात तरुणांची संख्या ही सर्वाधिक आहे. युवक देशाचा व कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. चांगल्या आरोग्यासाठी युवकांनी व्यसनाधिनतेपासून दूर राहावे, व चांगल्या सवयी आचरणात आणाव्यात. यामुळे जीवन निरोगी राहील, असे प्रतिपादन मुख्याध्यापक विठ्ठल चव्हाण यांनी केले.शिवाजी हायस्कूल गोवरी येथे १ ते ७ डिसेंबरपर्यंत एड्स प्रतिबंध जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंद चलाख, गजानन खामनकर, आर.एस. चहारे, रवींद्र येगीनवार, एन.बी. गोडशेलवार, सतीश भोयर, लक्ष्मीकांत किन्हेकर आदी उपस्थित होते.यावेळी चलाख यांनी एचआयव्ही एड्स रोगाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच रोगांपासून घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली. त्यांनतर रांगोळी स्पर्धा पार पडली. कार्यक्रमाचे संचालन प्रणाली गौरकार हिने प्रास्ताविक मयूरी बोबडे हिने, तर रोशन चहारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अरुण उरकुडे, शंकर लांडे, वैभव येसेकर, अनिल डाखरे, शितल अडबाले, प्रतीक्षा चन्ने, प्रणाली खिरवटकर, प्रगती खिरवटकर, पायल बावने, आम्रपाली सोयाम, प्रणित करमनकर, रोशन बोबडे, सुरज मालेकर, प्रशिल वनकर यांनी प्रयत्न केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोेठ्या संख्येने उपस्थित होते.
चांगल्या सवयी हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:06 IST
असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्हीचा प्रसार सर्वात मोठ्या प्रमाणावर होतो. एचआयव्ही बाधितात तरुणांची संख्या ही सर्वाधिक आहे.
चांगल्या सवयी हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली
ठळक मुद्देविठ्ठल चव्हाण : एड्स जनजागृती सप्ताह