शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडकालीन किल्ल्याचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:46 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बल्लारपुरातील गोंडकालीन किल्ल्यांचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. काळाच्या ओघात जीर्ण होत चाललेल्या किल्ल्याकडे काही वर्षांपासून पर्यटकाने पाठ फिरविली होती.

ठळक मुद्देपर्यटकांचा ओढा वाढणार : नगर पालिका व पुरातत्त्व विभागात सामंजस्य करार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बल्लारपुरातील गोंडकालीन किल्ल्यांचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. काळाच्या ओघात जीर्ण होत चाललेल्या किल्ल्याकडे काही वर्षांपासून पर्यटकाने पाठ फिरविली होती. किल्ल्याची दुरवस्था आणि किल्ल्याच्या परिसरातील वाढत चाललेल्या कचऱ्यामुळे शहर विद्रूप झाले. त्यामुळे न. प. ने पुढाकार घेऊन गोंडकालीन किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी पुरातत्त्व विभागांशी सामंजस्य करार केला. या करारानुसार गोंडकालीन किल्ल्याचा कायापालट होणार आहे. त्यामुळे पर्यटकाचा ओढा किल्ल्याकडे वाढणार आहे.नगराध्यक्ष हरीश शर्मा, वनविभाग महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्याधिकारी विपीन मुदधा आदींनी पर्यटकांसाठी विविध सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने या मोहिमेची माहिती पुरातत्व अधिकाºयांना दिली. गोंडकालीन किल्ल्यांचे पालटलेले स्वरूप पाहुन अधिकाऱ्यांनी सौंदर्यीकरणाला सहमती दिली.भारतीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावर पर्यटकासाठी नगर परिषदेद्वारे सुविधा पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर २४ मे ला स्वाक्षरी करण्यात आली.यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक नागपूरचे नबी रान, पुरातत्त्व अधीक्षक हाशमी, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, न. प. चे अभियंता संजय बोढे, इको प्रोचे बंडू धोत्रे उपस्थित होते.सदर कराराद्वारे नगर परिषदतर्फे किल्ल्यावर एम. एस.चे प्रवेशद्वार, किल्ल्यातील विहिरीवर लोखंडी जाळी, राणी महल खिडक्यांकरिता एम.एस. च्या ग्रील पायºयांवर व झेंडा वंदनेच्या जागेवर एम.एस. रेलिंग राणी महलच्या बाजुला एम.एस. रेलिंग, आर.ओ. कुलरद्वारे पाण्याची व्यवस्था, पर्यटकाकरिता बेंचेस, सोलार दिवे, किल्ल्याबाहेरील परिसरात े शौचालय व प्रसाधनगृह, बगीचा आणि अन्य विविध विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे.