शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाने बदलविली बीएड चौथ्या सेमिस्टरच्या पेपरची तारीख

By साईनाथ कुचनकार | Updated: May 10, 2023 18:49 IST

Chandrapur News एमपीएसपीच्या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नये तसेच मुंबईला जाणे सोयीचे व्हावे यासाठी विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलविली आहे.

साईनाथ कुचनकारचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित बी.एड.च्या चौथ्या सेमिस्टरचा १२ मे रोजी पेपर घेण्याचे विद्यापीठाने वेळापत्रक पूर्वीच जाहीर केले होते. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा १३ मे रोजी होत असून, या परीक्षेचे केंद्र मुंबईला आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत बीएडचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. एमपीएसपीच्या परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहू नये तसेच मुंबईला जाणे सोयीचे व्हावे यासाठी विद्यापीठाने परीक्षेची तारीख बदलविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाचा १२ मे रोजी होणारा पेपर आता २४ मे रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, परीक्षेची तारीख बदलविण्यासंदर्भात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विशेष प्रयत्न केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने उन्हाळी २०२३ च्या परीक्षा सुरू आहेत. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील बी.एड. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चौथ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा जेंडर स्कूल अँड सोसायटी या विषयाचा पेपर १२ मे रोजी घेण्याचे विद्यापीठाने यापूर्वीच वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ मे रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा आहे. या परीक्षेचे मुंबई येथे एकमेव केंद्र आहे.

लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले अनेक विद्यार्थी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे बी.एड.चे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना १२ मे रोजी होणारा पेपर देऊन मुंबईला जाणे शक्य नव्हते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार सुधाकर अडबाले यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पेपरची तारीख बदलविण्यासंदर्भात पत्र पाठविले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करीत १२ मे रोजी होणाऱ्या पेपरच्या तारखेत बदल करत २४ मे रोजी घेण्याचे ठरविले आहे. यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बी.एड.चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :examपरीक्षा