पेंढरी (कोके) : राष्ट्रसंतांची तपोभूमी गोंदेडा येथे २९ एप्रिलपासून शिबिरार्थी सुसंस्काराचे धडे घेत आहेत. गोंदेडा येथे होणाऱ्या या सुसंस्कार शिबिला ११ वर्षांची परंपरा आहे. या शिबिरात आठ जिल्ह्याचे एकूण २४० प्रशिक्षणार्थी सुसंस्काराचे शिक्षण घेत आहेत. यात परभणीपासून विद्यार्थी आले आहेत.श्री गुरुदेव आचार विचाराच्या प्रणालीनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा येथे २९ एप्रिलपासून श्री गुरुदेव सर्वांगिण सुसंस्कार शिबिर सुरू आहे.यात ध्यान प्रार्थना, रामधून, बौद्धीक, आसणे, प्राणायम, शारिरिक शिक्षण, कराटे, लाठीकाठी, तबला, पेटी, गायन, भजन, भाषण, संचालन, दिनचर्या, ग्रामसफाई, श्रमदान, राष्ट्रवंदना, महापुरुषांचे चरित्र्य दर्शन, स्वावलंबन सेवा, शिस्त, त्याग, निर्व्यसन, अनिष्ठ रुढी उच्चाटन, खंजेरी, सूर्य नमस्कार, ज्युडो, सुसंस्कार, कवायत, मनोरे, चित्तथरारक कवायत इत्यादी धडे सुसंस्कार शिबिरात शिबिरार्थी घेत आहेत. त्यासाठी शिबिराचे मुख्य संयोजक रविंद्रकुमार, चंद्रभान शेंडे, रमेश नान्ने, प्रा. भास्कर वाढई, राजकुमार शिरभय्ये, सतीश चिंधालोवे, आसवले गुरुजी, गौरव खांडेकर, पंकज पिसे, प्रणय मत्ते, गोलू दोहतरे, राजू कीर्तने, निखील शेंडे, दत्तू बनकर, मारोती मारभते आदी प्रशिक्षण देत आहेत. (वार्ताहर)
गोंदोड्यात मिळत आहेत सुसंस्काराचे धडे
By admin | Updated: May 14, 2015 01:46 IST