शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरी ग्रामपंचायतीत सदस्यांचा मनमानी कारभार

By admin | Updated: September 25, 2014 23:21 IST

येथील ग्रामपंचायत विविध मुद्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत असून गावातील प्रत्येक प्रभागात लावण्यासाठी आलेले पथदिवे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वार्थापोटी आपल्याच प्रभागात पळविल्याने

गोंडपिंपरी : येथील ग्रामपंचायत विविध मुद्यांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत असून गावातील प्रत्येक प्रभागात लावण्यासाठी आलेले पथदिवे ग्रामपंचायत सदस्यांनी स्वार्थापोटी आपल्याच प्रभागात पळविल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील बहुतांश मार्गावरील पथदिवे बंद आहेत. काही मार्गावर अद्यापही पथदिवे लावण्यातच आले नाहीत. तंटामुक्त समितीच्या पुरस्कारातून खरेदी केलेल्या बैठक ओट्यांचीही जागा चुकीची असून अशा नियंत्रणहीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर वरिष्ठस्तरावरुन कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तालुकास्तरावरील गोंडपिंपरी ग्रामपंचायतीवर शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सदर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन नागरिकांना द्यावयाच्या सोयीसुविधा हिसकावून स्वगृह परिसरात रस्ते, नळजोडणी, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते व पथदिवे बसवून कमालीचा मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. याच दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी या ग्रामपंचायतस्तरावर शहरातील प्रत्येक प्रभागाच्या मार्गावर लावण्यासाठी पथदिवे प्राप्त झाले. त्याचे नियोजन न करताच काही पदाधिकाऱ्यांनी आपला रुबाब दाखवून प्रभागाच्या वाट्याला येईल, त्या पेक्षा अधिक पथदिवे नेवून स्वत:च्या परिसरात लावून घेतले. पथदिवे बसविण्याचे कुठलेही नियोजन नसल्याने काही सदस्यांनी आपल्या आप्तांच्या दारातील खांबावरही पथदिवे लावून घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. येथील तंटामुक्त समितीला १० लाखांचा रोख पुरस्कार मिळाला. या पुरस्कारातून ग्रामपंचायत कार्यालयात महागडे शितल जल यंत्र, सौर ऊर्जेचे लाईट, बैठक ओटे अशी विविध साहित्य खेरदी करुन वाजवीपेक्षा अधिक रक्कमेचे बिल जोडल्याचीही आरोप नागरिकांकडून होत आहे.खरेदी करण्यात आलेले बैठक ओटेदेखील प्रभाग सदस्यांनी मनमर्जीने आपल्या प्रभागातील निकटवर्तीयांच्या दुकान व घरासमोर लावून नागरिकांच्या सोयींकडे दुर्लक्ष करीत संबंध जोपासण्यासाठी बैठक ओट्यांचा वापर केल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे.