शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भगवान पाटलांची वकिली मानवी मूल्ये जपणारी!

By admin | Updated: March 3, 2017 00:55 IST

षष्टयाब्दी निमित्त ज्येष्ठ नागरिक संघाने अ‍ॅड. भगवान पाटील यांचा नागरी सत्कार केला. यावेळी नामवंताची उपस्थिती

प्रतिष्ठित व नामवंतांचा सहभाग : षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त नागरी सत्कारचंद्रपूर: षष्टयाब्दी निमित्त ज्येष्ठ नागरिक संघाने अ‍ॅड. भगवान पाटील यांचा नागरी सत्कार केला. यावेळी नामवंताची उपस्थिती सोहळ्याची उंची वाढविणारी होती. अ‍ॅड. भगवान पाटील यांनी पैशासाठी वकिली केली नसून ती मानवी मूल्यांची जोपासना करणारी असल्याच्या भावना यावेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केल्या.या सोहळ्याचे उद्घाटन आ. नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. के. आरीकर होते. प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कारमूर्ती अ‍ॅड. भगवान पाटील व त्यांच्या पत्नी विजया पाटील यांना मानपत्र, शाल व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. या निमीत्त षट्यब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोलताना आ. नाना शामकुळे व केंद्रीय मंत्री ना. अहीर यांनी अ‍ॅड. पाटील यांच्याबद्दल बोलताना विविध क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केल्याचे सांगितले. अ‍ॅड. पाटील यांनी काही मूल्य प्रमाण मानले. त्यांनी पैशासाठी वकिली केली नाही. अ‍ॅड. पाटील यांचे नंदूरबार येथून लहान बंधू डॉ. मोहन पाटील यांच्या भाषणाने नवचैतन्य निर्माण झाले. कार्यक्रमाला नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण पाटील, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. हिराचंद बोरकुटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, सचिव केशवराव जेणेकर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. पी. सी. खजांची, जिल्हा बार असो. अध्यक्ष अ‍ॅड. रमेश टिपले, माजी अध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, माजी अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद टंडन, अ‍ॅड. प्रकाश सपाटे, विचारवंत एल. के. मडावी, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र वैद्य, गोसीखुर्द धरण संघर्षाचे नेते अ‍ॅड. गोविंद भेंडारकर आदी उपस्थित होते. सत्कार सोहळा समितीचे सचिव राजू हनमंते यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन प्रा. डॉ. सुनिता भगत, सन्मानपत्राचे वाचन प्राचार्या विद्या बांगडे यांनी केले. (प्रतिनिधी)