लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील माऊंट इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजचे शारीरिक शिक्षक रमेश नतरगी यांनी नुकत्याच झालेल्या श्रीलंका अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पीयशनपीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून रजत पदक पटकाविले आहे. तर, मास्टर अॅथलेटिक स्पेन येथे जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करीत १०१ देशातून २० वा क्रमांक पटकावून भारताचे नाव उंचावले आहे.नतरगी यांनी महाराष्ट्र मास्टर अॅथलेटिक पुणे येथील तीन दिवसीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नतरगी यांनी बल्लारपूर शहरासह महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे. नतरगी यांच्या कार्याची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश झाडे यांनी सत्कार केला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच शाळेतील सर्व कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी रमेश नतरगी यांनी मनोगत व्यक्त केले.
बल्लारपूरच्या शिक्षकाचा श्रीलंकेत गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:24 IST