शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

वन्यजीवांच्या शिकारीऐवजी पिण्यास पाणी द्या - प्रकाश कामडे

By admin | Updated: May 19, 2016 00:49 IST

उन्हाळ्यात उष्णतेमुळे वाढणारी दाहकता, सर्वत्र भासणारी पाण्याची कमतरता नवीन नाही. उन्हाळ्यात नदी, नाले, तलाव, जंगलातील नैसर्गिक स्रोत सर्वच कोरडे पडतात.

चंद्रपूर : उन्हाळ्यात उष्णतेमुळे वाढणारी दाहकता, सर्वत्र भासणारी पाण्याची कमतरता नवीन नाही. उन्हाळ्यात नदी, नाले, तलाव, जंगलातील नैसर्गिक स्रोत सर्वच कोरडे पडतात. तेव्हा वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याचाच परिणाम म्हणून कधी कधी प्राणी उष्माघाताने मृत्युमुखीसुद्धा पडतात. काही वन्यजीव हे गावातील तलाव आणि नद्या यामध्ये आपली तहान भागविण्यासाठी येतात. परंतु गावकरी व शिकारी याचा फायदा घेत शिकार करतात. पाणी पिण्यासाठी वन्यजीवांची शिकार करून पाप करण्यापेक्षा त्यांना पिण्यास पाणी देऊन पुण्य कमवा, असा मौलिक सल्ला सार्डचे अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी भामडेळीवासीयांना दिला.ते भामडेळी येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भामडेळी येथील इको फ्रेन्डली स्कूल म्हणून नावारूपास आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भामडेळी येथे सोमवारी सार्ड संस्थेच्या वतीने पक्ष्यांसाठी फुडर व पाणीपात्र लावण्यात आले. साध्य संस्था पुणे, यांच्या या कार्यक्रमात साध्य संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना कपडे, जोडे, सॉक्स, पेन-बुक, बॅग, खेळण्याचे साहित्य, टिफीन बॉक्स, वॉटर बॅग आदी साहित्य वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना मार्कंडेवार आणि शिक्षक विजय खनके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून अनेक प्रकारचे विज्ञान प्रयोग, समूह नृत्य, एकांकिका यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. सार्ड संस्थेच्या वतीने विजय खनके व मुख्याध्यापिका वंदना खनके यांच्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश चोपने होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कामडे, सरपंच संतोष जमदाडे, साध्य संस्था पुणेचे अध्यक्ष सौरभ गुप्ता, भाविक येरगुडे, राकेश म्हस्के उपस्थित होते. संचालन विजय खनके यांनी तर आभार वंदना मार्कंडेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी पारूल गुप्ता, सुजीत गोयल तसेच भामडेळीवासीयांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)