शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मागणीेनुसार निधी मिळेलच नागरिकांना पाणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:56 IST

जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक आहे. तिथे आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध केल्या जाईल. यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ मागणी करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईची झळ बसू नये. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईचा युद्ध पातळीवर सामना करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : उपाययोजनेत अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा नको

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये पाणीटंचाई अधिक आहे. तिथे आवश्यकतेनुसार सर्व उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध केल्या जाईल. यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ मागणी करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईची झळ बसू नये. त्यामुळे प्रशासनाने पाणी टंचाईचा युद्ध पातळीवर सामना करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त संजय काकडे व सर्व नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात उन्हाळाभर पुरेल एवढी पाण्याची उपलब्धता आहे. मात्र दुर्लक्ष किंवा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवता कामा नये. उपाययोजनेचे अचूक नियोजन करावे. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाºयांनी वर्तमानपत्रांमध्ये पाणी टंचाईसंदर्भात येणाºया बातम्यांकडे लक्ष द्यावे. ज्या ठिकाणी गरज भासत आहे. त्याठिकाणी तातडीची उपाययोजना करावी. यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दिली. पाणीसंवर्धन करण्याच्या दृष्टीने जनजागृतीचे काम प्रशासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी प्राधान्याने करावे असे सांगत पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरता येईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई व उपाययोजनेबाबत माहिती सादर केली.पालकमंत्र्यांकडून ‘लोकमत’ची दखलजिल्ह्यातील पाणीटंचाई समस्येवर ‘लोकमत’ ने विशेष पान प्रकाशित केले होते. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यातील वृत्ताची दखल घेऊन पाणी टंचाईच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्यास प्रशासनाने गांभीर्याने घेऊन बातम्यांवरून तातडीची उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.हलगर्जीपणा करणारे अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात.मनपाने टोल फ्री क्रमांक द्यावामनपाने पाणीटंचाई संदर्भात नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा. ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत विशिष्ट दूरध्वनी क्रमांक तयार करून प्राप्त तक्रारींचे निराकरण यंत्रणेमार्फ त करावे. महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात यावी. आवश्यकता असणाºया वॉर्डात हातपंप खोदण्याचा निर्णय या समितीच्या बैठकीत घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.