शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांना हक्काचे पट्टे द्या

By admin | Updated: October 24, 2015 00:35 IST

चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, ..

चिमूर तापले : निवडणुकीत मुद्दा गाजणार चिमूर : चिमूर येथील इंदिरानगर व केसलापूर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता बराच पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान जून २००६ मध्ये या संदर्भात प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अजूनपर्यंत चिमूर येथील इंदिरानगर झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे दस्ताऐवज प्राप्त झाले नसल्यामुळे नागरिकांत शासन व प्रशासनाच्या विरोधात असंतोष पसरला आहे.चिमूर येथील इंदिरा नगर झोपडपट्टीधारकांना जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, या मागणीकरिता कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे मार्फत २००२ पासून संघर्ष सुरू आहे. इंदिरा नगरात मागील ४० वर्षांपासून शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक, घरेलू कामगार, झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. या वस्तीच्या घरांना भोगवटा कर लावण्यात आला आहे. हा कर नियमित भरणाऱ्या झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाही. शेवटी कष्टकरी जन आंदोलनाने पुढाकार घेऊन ३१ मार्च २००३ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनाच्या प्रति सर्व लोकप्रतिनिधीला देण्यात आल्या. त्यानुसार तत्कालीन आमदार तथा विद्यमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३० एप्रिल २०१३ रोजी तहसीलदारांना पत्र पाठविले. या पत्राची दखल न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांनी स्मरणपत्र दिले. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना चौकशी अहवाल पाठवा, अशी सूचना केली होती. याही सूचनेचे पालन करण्यात आले नाही.आठ दिवसानंतर प्रशासनातर्फे कुठलीही हालचाल न झाल्याने २४ आॅगस्ट व १० सप्टेंबर २०१४ रोजी धरणे आंदोेलन करुन हजारोंच्या संख्येत शक्तिप्रदर्शन केल्याने प्रशासनात थोड्या हालचाली सुरू झाल्या होत्या. १० जून २००५ रोजी तलाठ्याने सकारात्मक अहवालसुद्धा तहसीलदारांना दिला होता. या अहवालानंतरसुध्दा पट्टे देण्यात आले नाही. तेव्हा २४ आॅक्टोबर २००५ रोजी तत्कालिन तहसीलदार अरुण झलके यांना शिष्टमंडळाच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले होते. तेव्हा झलके यांनी या परिसरात झोपडपट्टी धारकांना दंड आकारला. तो दंड झोपडपट्टीधारकांनी जमा केला. मात्र आज तारखेपर्यंत या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले नाहीत. एखाद्या मागणीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर हालचाली करणे हे प्रशासनाचा धर्म झालेला दिसतो. या मागणीकरिता आंदोलन करुन झोपडपट्टीधारक आता थकले असावेत, असा भ्रमात शासन व प्रशासनाने राहू नये. येत्या काही दिवसातच आंदोलनाच्या तयारीत येथील जनता आहे. (तालुका प्रतिनिधी)