शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धानाला ३५०० रूपये प्रति क्विंटल भाव द्या

By admin | Updated: November 27, 2015 01:16 IST

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

धान परिषदेत उमटली मागणी : सावली येथे पार पडली पहिली परिषद सावली : दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांवर असलेले संकट पेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. शासन त्यांना कोणतीही मदत करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धानाला प्रति क्विंटल ३ हजार ५०० रूपये भाव द्यावे, अशी मागणी शेतकरी परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पहिली सर्वपक्षीय धान परिषद सावली येथे गुरूवारी पार पडली. सदर धान परिषदेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धान परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारण्याचा संकल्प करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या उपस्थित शेतकऱ्यांसमोर कोणताही आगत-स्वागताचा, हारतुऱ्याचा बडेजावपणा न करता साध्यापद्धतीने ज्येष्ठ शेतकरी सुकरुन पाटील आभारे व तिमाजी गेडाम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दिवगंत मुख्यमंत्री वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संविधान दिनाचे औचित्य साधून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, उदय बोरेवार, मूल पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार, सावली पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा आखाडे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, एच.एम.टी. धानाचे संशोधक दादाजी खोब्रागडे, महाराष्ट्र भूषण प्रगतशिल शेतकरी शिवदास कोरे, ईश्वर कामडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शामराव मोहुर्ले यांची उपस्थिती होती.याप्रसंगी २१ डिसेंबरपासून मूल येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शासनाचा प्रतिनिधी जोपर्यंत ठिय्या आंदोलनाला भेट देणार नाही, तेव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहील व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलनाची धार तीव्र केली जाईल, असा ठरावही यावेळी मांडण्यात आला. तसेच अनेक ठराव पारीत करण्यात आले. या धान परिषनेचे प्रास्ताविक राजाबाळ पाटील संगीडवार यांनी केले. संचालन मोतीलाल दुधे तर आभार राजू व्यास यांनी मानले. हजारांवर शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)