शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलिडिटीचे प्रस्ताव स्वीकारण्याचे अधिकार तहसीलदारांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:40 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र तपासणी कार्यालय गडचिरोली जिल्हा मुख्यालयी आहे.

सुदर्शन निमकर यांची मागणी : प्रमाणपत्रासाठी जावे लागते गडचिरोलीला राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र तपासणी कार्यालय गडचिरोली जिल्हा मुख्यालयी आहे. त्यामुळे तेथे जाऊन प्रस्ताव सादर करणे किंवा पोच पावती आणणे अनेकांना अडचणीचे जाते. त्यामुळे व्हॅलिडिटीचे प्रस्ताव स्वीकारण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याची मागणी माजी आ. सुदर्शन निमकर यांनी केली आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या ९ जुलैला राज्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यात बहुतांश ग्रामपंचायती या आदिवासी उपायोजन क्षेत्रातील पेसा अंतर्गत येत असल्याने या ठिकाणी अधिक प्रमाणात अनुसूचित जमाती प्रवर्गातून उमेदवार आहे. त्या उमेदवारांना निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र सादर करते वेळी जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती जोडणे अनिवार्य आहे. अशा वेळी आदिवासी उमेदवारांना गडचिरोली येथे जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. कधी वेळेवर प्रस्तावही सादर होत नाही. परिणामी उमेदवारीपासून दूर राहावे लागते. याकरिता सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तहसीलदार यांच्या मार्फत स्वीकारुन उमेदवारांना पोच पावती देण्यासंबंधीची मागणी माजी आ. सुदर्शन निमकर यांनी केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ७५ टक्के ग्रामपंचायती या आदिवासी उपायोजना क्षेत्रातील पेसा अंतर्गत येणाऱ्या असून ५० टक्के पेक्षा जास्त पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यातील ५० टक्केच्या वर महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. निवडणुकीकरीता सक्षम उमेदवारांचा शोध घेणे, त्याचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राकरिता आवश्यक पुरावे व इतर कागदपत्र गोळा करणे अत्यंत जिकरीचे असून अशातच जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केल्याची जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातून पोच पावती विहित मुदतीत आणणे उमेदवारांना शक्य होत नाही आहे.या सर्व समस्या दूर सारण्यासाठी सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तहसीलदार यांच्या मार्फत स्वीकारुन उमेदवारांना पोच पावती देण्याची मागणी माजी आ. सुदर्शन निमकर यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)