शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजला संत जगनाडे महाराज यांचे नाव द्या

By admin | Updated: August 14, 2015 01:23 IST

चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयाला तेली समाजाचे आराध्व दैवत संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्याची मागणी तेली समाज व युवा एल्गार संघटनेच्या वतीने ...

मुख्यमंत्र्यांना निवेदन : तेली समाज व युवा एल्गार संघटनेची मागणीचंद्रपूर : चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयाला तेली समाजाचे आराध्व दैवत संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्याची मागणी तेली समाज व युवा एल्गार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हा तसेच महाराष्ट्र पातळीवर तेली समाज मोठ्या संख्येने आहे. परंतु शासन पातळीवर कोणत्याच योजना अथवा महत्त्वपूर्ण लोकोपयोगी संस्थेला जगनाडे महाराज यांचे नाव नाही. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजाचे भक्त होते. संत जगनाडे महाराज यांची थोडक्यात माहिती अशी की तुकारामाच्या वैकूंठ गमनानंतर शाहिस्तेखानाने हल्ला केला. संताजी वह्यांची दौलत घेऊन सुदूंबरेला गेले. पुन्हा दिलेरखानचा हल्ला झाला. त्यावेळीसुद्धा अत्यंत कष्टाने संताजीने तुकोबाचा अभंय ओव्या लिहिलेल्या वह्यांचे जतन केले, तुकोबाच्या स्वहस्ते लिहिलेल्या वह्या, या झालेल्या हल्ल्यामध्येच, जाळपोळीत नष्ट झाल्या असाव्यात, असा बहुतेक जनतेचा समज होता. परंतु काही समाजकंटकांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात तुकोबाचे अभंग, ओव्या लिहिलेल्या वह्या बुडविल्या. परंतु संताजीनी पुन्हा तुकोबांचे अभंग मुकपाट जसेच्या तसेच लिहून पुन्हा समाजामध्ये प्रचलित आणले. असे महान कार्य श्री संताजी जगनाडे महाराजांनी केले. त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याचे नाव वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात यावे, अशी तेली समाज बांधवांची मागणी आहे.सदर मागणीचे निवेदन रामदास तडस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुडे, आमदार नाना श्यामकुळे यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात तेलीक युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र रघाताटे, उपाध्यक्ष जितू इटनकर, सचिव शैलेश जुमडे, कोषाध्यक्ष मनोज बेले यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)