शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आपुलकीच्या भावनेतून सामान्य नागरिकांना शासकीय सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 01:10 IST

पोंभुर्णा येथे बांधण्यात आलेली पंचायत समितीची इमारत देखणी आहे. या इमारतीसाठी लागणारे...

सुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा तालुक्याला विकासात अग्रेसर करूचंद्रपूर : पोंभुर्णा येथे बांधण्यात आलेली पंचायत समितीची इमारत देखणी आहे. या इमारतीसाठी लागणारे आवश्यक साहित्यही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. परंतु या देखण्या इमारतीत सर्व सामान्यांना शासकीय सुविधेचा लाभ तत्परतेने आणि आपुलकीच्या भावनेने मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.पोंभुर्णा येथे ९२ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या नवीन पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्याच्या हस्ते केल्यावर ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेलसिंह चंदेल, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, सदस्या अल्का आत्राम, पंचायत समिती सभापती बाबुपाटील चिंचोळकर, नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, पंचायत समिती सदस्या संगिता घोगंडे, भारती कन्नाके, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे आदी उपस्थित होते.सरकार सामान्य माणसाच्या सेवेसाठी काम करते. सामान्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ही इमारत बांधण्यात आली आहे. येथे चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी येथे काम करणा-यांची आहे. पोंभुर्णा तालुका विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी अनेक कामे केली जात आहे. लवकरच तालुक्यातील सर्व शाळा ई-लर्निग केल्या जाणार असून अंगणवाडयामध्येही अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जातील. मुलांवर लहान वयात चांगले संस्कार व बौध्दिक ज्ञान देण्याचा यातून प्रयत्न केला जात आहे.तालुक्यातील सिंचनाच्या सुविधावर लक्ष दिले जात आहे. सर्व मालगुजारी तलावांचे नूतनीकरण व खोलीकरण केले जाईल. पोंभुर्णा मागास तालुका म्हणून असलेली ओळख लवकरच पुसून काढेल. विकासाचा तालुका म्हणून पोंभुणार्ची ओळख निर्माण होईल. येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले असून हे रुग्णालय राज्यातील सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक रुग्णालय बनवू. दोन वर्षांत रुग्णालयाची देखणी इमारत उभी राहील.पोंभुर्णा तालुक्यात ज्या ग्राम पंचायतींना स्वत:ची इमारत नाही, अशा सर्व ग्राम पंचायतींना लवकरच स्वत:च्या हक्काच्या इमारती उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. पंचायत समितीत मॉड्यूलर फर्निचर बनविले जाणार असून यासाठी १ कोटी ७८ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. असे फर्निचर असलेली पोंभूर्णा ही राज्यातील प्रमुख पंचायत समिती राहणार आहे.प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रास्ताविक केले. याच कार्यक्रमात पालकमंत्र्याच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वृंदा चिलनकर व माया शेंडे या महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)