शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निधीतून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या

By admin | Updated: August 9, 2015 01:17 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या वर्ग १ ते ८ मधील अनुसूचित जाती- जमातीची मुले, ....

विजय देवतळे : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनचंद्रपूर : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या वर्ग १ ते ८ मधील अनुसूचित जाती- जमातीची मुले, सर्व मुली आणि दारिद्र्यरेषेखालील मुलांना शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दोन गणवेश मोफत पुरविल्या जातात. मात्र इतर मागास, बिगर मागास, विमुक्त भटक्या, विशेष मागास प्रवर्गातील मुलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांनाही जिल्हा निधीतून मोफत गणवेश पुरविण्यात यावे, अशी मागणी जि.प. चे स्थायी समितीचे सदस्य डॉ.विजय देवतळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे.गणवेशाचे वितरण करताना शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनासुद्धा अनेक पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समितीकडून शाळामधूनच जातीयवादाचे बीजारोपण केल्या जात आहे. शिस्त, सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे धडे देणारे शिक्षकसुद्धा या योजनेमुळे हतबल झाले आहेत. या संदर्भात अनेक पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या यांच्या सुचनांची दखल घेत डॉ. विजय देवतळे यांनी जि.प. च्या अध्यक्ष संध्या गुरनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले. त्यांनी सर्व शिक्षा अभियानापासून वंचित राहणाऱ्या सर्व जातीच्या संवर्गातील मुलांना जि.प. च्या जिल्हा निधीतून सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात मोफत गणवेश पुरविण्याची मागणी केली. सर्वांना गणवेश दिल्यास मुलांमध्ये दुजाभाव निर्माण होणार नाही, त्यांच्यामध्ये शाळेची आवड निर्माण होऊन गैरहजेरीचे प्रमाणही कमी होईल, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याचे समाधान विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्यांना होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति शिक्षण सभापती देवराव भोंगळे, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांना दिले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)