शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना योजनेतून घर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:54 IST

चंद्रपूर मनपा व जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमाची अंमलबजावणी सफाई कामगारांवर येते. त्यामुळे कामगारांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध योजनांमधून घर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले. समाज कल्याण कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात बुधवारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देदिलीप हाथीबेड : सामाजिक न्याय भवनात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर मनपा व जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमाची अंमलबजावणी सफाई कामगारांवर येते. त्यामुळे कामगारांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध योजनांमधून घर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले. समाज कल्याण कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात बुधवारी आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, चंद्रपूर मनपाचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद कुलकर्णी वनगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित समस्यांचा आयोगाचे हाथीबेड यांच्या उपस्थितीत निपटारा करण्यात आला. राज्यातील काही महानगरपालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना अंतर्गत घरे उपलब्ध करून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. चंद्रपूर महानगरपालिकेने या संदर्भात पाऊल उचलल्याबद्दल समाधान व्यक्त केले. लाड समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकृतिबंधानुसार सफाई कर्मचाऱ्यांची भरती, महानगरपालिका सफाई कामगारांसाठी आवश्यकतेनुसार घरे, अनुकंपा भरती प्रक्रिया गतिशील करणे, सुट्टीच्या दिवशी कामाचा मोबदला निश्चि करणे, कालबद्ध पदोन्नतीमधील प्रकरणे निकाली काढणे, कंत्राटी पद्धतीच्या कामात सफाई कामगारांना प्राथमिकता देणे, किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिल्यास कारवाई करणे, पोलिस ठाण्यांमध्ये नियुक्ती बाबतचा प्रस्ताव पाठवणे आदी मुद्यांवर चर्चा झाली. जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये प्रतिनिधींना सहभागी करण्यात येईल. दोन महिन्यातून एकदा समितीची बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी गौरीशंकर गावकर, पवन सातपूते, विजय हारकर, भालचंद्र राऊत आदीसह सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.