सावली : वंशाचा दिवा म्हणून मुलांना जन्म देण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. जो तो मुलगाच व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र सावली येथील पाचही मुलीच असलेल्या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शंकर उकाजी दुधे यांचे ६५ व्या वर्षी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवाला मुलींनी खांदा देण्यासाठी पुढे आल्याने सावली गावात नवा आदर्श निर्माण केला आहे.दिवंगत शंकर दुधे यांच्या पाचही मुली उच्च शिक्षित आहेत. वेगवेगळ्या विभागात शासकीय सेवेत आहेत. त्यांनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचे धाडस करुन समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. खांदा देण्याची मुलांची परंपरा त्यांनी मोडीत काढली आहे. शंकर दुधे यांच्या पश्चात बराच मोठा परिवार असून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दिवंगत भाऊ दुधे यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले. (तालुका प्रतिनिधी)
पित्याला दिला मुलींनी खांदा
By admin | Updated: March 19, 2015 00:51 IST