चंद्रपूर : येथील समाजसेवी भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक संघवी यांना शनिवारी नाशिक येथे अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सदर पुरस्कार सामाजिक कार्याची दखल घेऊन देण्यात आला.यापूर्वी १२ आॅक्टोबर २०१४ ला अशोक संघवी यांना राज्यस्तरीय जैन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार अशोक संघवी यांना विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार दिलीप गांधी, माजी सहकारी मंत्री तथा आमदार जयप्रकाश मुंदडा, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख, माजी पुरवठा मंत्री रमेश बंग, माहेश्वरी सभेचे प्रदेश अध्यक्ष सतीश चरखा, आंतरराष्ट्रीय वक्ता पवन अग्रवाल व अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजीत बागमार आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, राजकीय, विवाह, उद्योग, खेळ, सांस्कृतिक, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)
अपघातामध्ये बालिका ठार
By admin | Updated: January 20, 2016 01:54 IST